Jayant Patil News : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी राम खाडे यांच्यावरील हल्ला प्रश्न सभागृहात उपस्थित केला. हाॅटेलसमोर प्राणघातक हल्ला झाला. ते मेले समजून दहा ते बारा हल्लेखोर निघून गेले. या हल्ल्याला 15 दिवस झाले तरी हल्लेखोर सापडत नाही. पोलिस हजामती करतात की काय याचे आश्चर्य वाटते, असे जयंत पाटील म्हणाले.
मंत्री संजय सावकारे यांन जयंत पाटलांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत 'हजामती' शब्द वापरू नका, असे सांगितले. त्यावर जयंत पाटलांनी तुम्ही प्रतिशब्द सांगा, मला मराठी कमी येते, असे म्हणत सावकारेंना प्रतिआव्हान दिले. तसेच शब्द न हटवण्यावर ठाम राहिले. सावकरे यांनी तालिका अध्यक्षांना हा शब्द हटवण्याची मागणी केली. त्यावर जयंत पाटलांनी मंत्री झाला म्हणून लय कळत नाही, असे टोला लगावला.
जयंत पाटील म्हणाले, आमच्या पक्षाचे पदाधिकारी राम खाडे यांच्यावर हल्ला झाला. ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी अनेक देवस्थान जमीनीचे घोटाळे बाहेर काढले. त्यांना मध्यल्या काळात पोलिसांनी संरक्षण दिले होते. ते पोलिस संरक्षण काढून घेण्यात आले. त्यांच्या बंदुकी परवान्याचे नुतनीकरण करून दिले नाही.
तालिका अध्यक्ष रेकाॅर्डवरून शब्द काढण्यात येत आहे, असे म्हटले. त्यावर जयंत पाटलांनी कुठला शब्द असा प्रतिप्रश्न करत हजामती हा शब्द असंसदीय नाही. मी सरकारवर नाही तर पोलिसांवर टीका करतोय, तुम्ही कारण सांगा शब्द का हटवत आहात, असे त्यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.