NCP Jayant Patil: मोठी बातमी: शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवली; जयंत पाटलांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनाच्या कार्यक्रमात जयंत पाटील म्हणाले, मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. आज सात वर्षाचा कालावधीमध्ये मी प्रदेशाध्यक्ष आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक असल्याचं जयंत पाटील म्हणाले होते.
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचे संकेत दिले होते. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोरच प्रदेशाध्यक्ष पदापासून बाजूला होण्याबाबत भाष्य केलं होतं. अखेर जयंत पाटलांनी (Jayant Patil) आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती होणार असल्याचं जवळपास निश्चित मानले जात आहे. ते मंगळवारी (ता.15 जुलै) प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्विकारणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षामध्ये भाकरी फिरवली जाणार असल्याचे संकेत यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देण्यात आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेले काही महिन्यांपासून प्रदेशाध्यक्षपदाचा वाद चिघळला होता. त्यातही विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रदेशाध्यक्ष बदलासाठी जोर धरला. यात रोहित पवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींचं या पदासाठी नावं आघाडीवर होती. मुंबईत झालेल्या पदाधिकारी बैठकीत जयंत पाटील यांना थांबवण्याची मागणीही शरद पवार यांच्यासमोरच झाली होती. यामुळे जयंत पाटलांवर या पदापासून बाजूला होण्यासाठी दबाव निर्माण करण्यात येत आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनाच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षांच्या कालावधीपासून मी प्रदेशाध्यक्ष आहे. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. पण त्यांच्या थांबण्याच्या भूमिकेनंतर बालगंधर्व रंगमंदिर येथे एकच गोंधळ झाला अनेक कार्यकर्त्यांनी उठून त्यांच्या या वक्तव्याला विरोधही दर्शवला होता.

Jayant Patil
Shivsena UBT Politics : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ठाकरेंचा सुरुंग! भाजप प्रदेशाध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात 'दे धक्का', काँग्रेस,राष्ट्रवादीतूनही इन्कमिंग!

याबाबत पवारसाहेब यांनी योग्य तो निर्णय घ्यावा असं म्हणत जयंत पाटील यांनी भाषण आवरतं घेतलं होतं. प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला होण्याचे जयंत पाटील यांचे संकेत दिल्यानंतर याबाबत शरद पवार नेमका निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर जयंत पाटलांनी राजीनामा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com