Jayant Patil Resigns : जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; पश्चिम महाराष्ट्रातील तरुण, बड्या नेत्याकडे येणार जबाबदारी?

जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा दिला आहे. सध्या नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून आमदार शशिकांत शिंदे, यांचे नाव जळपास अंतिम मानले जात आहे.
Jayant Patil steps down from NCP Sharad Pawar faction; Shashikant Shinde likely to take charge as new Maharashtra state president.
Jayant Patil steps down from NCP Sharad Pawar faction; Shashikant Shinde likely to take charge as new Maharashtra state president.Sarkarnama
Published on
Updated on

Jayant Patil resign, Shashikant Shinde News : अखेर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ते 2018 पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि 2024 पासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वात पक्षाने 2019 आणि 2024 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवली होती. पण मागील काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु होती. अखेर त्यांनी आज (12 जुलै) रोजी राजीनामा दिला.

दरम्यान, जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर नव्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीसाठी सोमवारी (14 जुलै) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली आहे. सध्या नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून आमदार शशिकांत शिंदे, यांचे नाव जळपास अंतिम मानले जात आहे. ते मंगळवारी पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. याशिवाय माजी मंत्री राजेश टोपे आणि माजी आमदार सुनिल भुसारा यांचीही नावे चर्चेत आहेत.

कोण आहेत शशिकांत शिंदे?

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील हुमगाव हे शशिकांत शिंदे यांचे मूळ गावं होयं. माथाडी कामगार ते माथाडी नेता अशी त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. तिथून ते शरद पवार यांच्या संपर्कात आले. 1999 साली जावळी मतदारसंघातून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2004 मध्येही ते विजयी झाले. 2009 आणि 2014 मध्ये त्यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून विजय मिळविला.

या दरम्यान त्यांच्याकडे राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपदाचीही जबाबदारी आली. 2019 मध्ये मात्र शिंदे यांचा शिवसेनेच्या महेश शिंदे यांच्याकडून पराभव झाला. पण 2020 मध्ये त्यांना पक्षाने विधान परिषदेवर संधी दिली. 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही शिंदे यांचा पराभव झाला. पण त्यांनी न खचता जिद्दीने काम सुरु ठेवले आहे. आता त्यांची पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून चर्चा सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com