Jayant Patil News:...एकदा राज्यपालांशी चर्चा करा; असे जयंत पाटील सरकारला का म्हणाले ?

Maharashtra assembly session : शनिवारी सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू झाली आहे. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा दोन्ही बाजूच्या आमदारांनी अभिभाषणावर परखडपणे भूमिका मांडली.
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama

Assembly Session : राज्य विधिमंडळांचे पावसाळी अधिवेशन गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. शनिवारी सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू झाली आहे. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा दोन्ही बाजूच्या आमदारांनी अभिभाषणावर परखडपणे भूमिका मांडली.

वारंवार राज्यपालांच्या भाषणात असे मुद्दे घालून राज्यपालांचीही फसवणूक होत आहे. त्यांना भाषण वाचतानाही वाटत असेल की हे काय लिहिलंय आणि मी हे काय वाचतोय. राज्यपाल फार चांगले आहेत. तुम्ही जाऊन त्यांना भेटा आणि एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेची चर्चा करा, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Ncp) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यपालांच्या अभिभाषणातील एक ट्रिलियनची अर्थव्यवस्था या उल्लेखावर आक्षेप घेतला. (Jayant Patil News)

यावेळी सभागृहात बोलताना जयंत पाटील (Jaynat Patil) यांनी सत्ताधारी मंडळींवर जोरात टीका केली आहे. राज्यात सात-साडेसात टक्के विकासदर आहेत. तो सतरा टक्के झाला तर 2027-28 साली आपण एक ट्रिलियनवर पोहोचू याचे राज्यकर्त्यांना भान आणून देणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या काळात काही एक ट्रिलियन होत नाही. ते व्हावेत यासाठी काही प्रयत्नही होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधी बाकांवरील आमदारांमध्ये पिकला हशा

वारंवार राज्यपालांच्या भाषणात असे मुद्दे घालून त्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. ‘क्या बोल रहे है, क्या लिख रहे है. लेकिन मुझे पढना पड रहा है’ असे ते म्हणत असतील. हा माझा दावा नाही. हा अंदाज आहे, असं जयंत पाटील यांनी म्हणताच विरोधी बाकांवरील आमदारांमध्ये एकच हशा पिकला.

Jayant Patil
Aditya Thackeray News : आदित्य ठाकरेंची प्रसाद लाड यांना कोपरखळी; म्हणाले, 'हिंदुत्व स्वीकारतात वाटतं...'

एक ट्रिलियनचा दावा वास्वतववादी नाही

राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन करायची आहे, हे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आहे. हे राज्यपालांच्या भाषणातच आहे. म्हणजे ते लक्ष्य अवघड आहे हे राज्यपालांनी मान्य केले आहे. त्यामुळे हा एक ट्रिलियनचा दावा वास्वतववादी नाही हे अप्रत्यक्षपणे राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितले असल्याचा दावा यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी केला आहे.

राज्याचा विकासदर 17 टक्के झाला पाहिजे

मित्रा नावाच्या संस्थेनं एक अहवाल दिला आहे. त्यामध्ये राज्यात 6 वर्षांत 1.53 ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक असेल, तरच महाराष्ट्रात एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होऊ शकते. त्यासाठी महाराष्ट्राचा विकासदर 17 टक्के झाला पाहिजे. तरच आपण 2027-28 वर्षापर्यंत एक ट्रिलियनपर्यंत पोहोचू शकतो. नाहीतर तसे आपण 32-34 साली कधीतरी पोहोचणारच आहोत. ते आपोआपच होईल, असेही यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Jayant Patil
Video Kundlik Khande News : मोठी बातमी! कुंडलिक खांडेंची शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी, पक्षविरोधी काम केल्याने कारवाई

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com