NCP Politics : अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी जयंत पाटलांच्या शुभेच्छा, म्हणाले 'पाच वर्ष तरी...'

Jayant Patil On Ajit Pawar : जातीनिहाय जनगणनेनंतर आता आमचा पुढचा आग्रह असेल ज्याचा जेवढा हिस्सा असेल तेवढा त्याला न्याय मिळाला पाहिजे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
Jayant Patil attacked dcm Ajit Pawar
Jayant Patil attacked dcm Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Jayant Patil News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा कधीच लपवून ठेवली नाही. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात एका वक्त्याने राज्याला महिला मुख्यमंत्री मिळाली पाहिजे, असे वक्तव्य केले. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, 'शेवटी योग जुळून यावा लागतो. कारण मलाही अनेक वर्षांपासून वाटतं की मुख्यमंत्री व्हावं पण जमतंय कुठं'

अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ज्यांना मुख्यमंत्री व्हायचा त्यांना माझ्या शुभेच्छा. आता पाच वर्ष आमचा काही प्रश्न नाही. या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा हे तीन पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांना (अजितदादांना) संधी मिळाली तर आम्हाला आनंद होणार. आम्ही त्यांच्यासोबत काम केलं आहे.

Jayant Patil attacked dcm Ajit Pawar
Sushma Andhare Vs Anjali Damania : 'धनंजय मुंडेंची शिकार तुम्ही केली या...', अंजली दमानियांना सुषमा अंधारेंनी धू धू धुतले

धार्मिक राजकारणे देश मागे राहिले

धार्मिक राजकारण करणारे देश मागे राहिले. धार्मिक देशांची नावे घ्या तेथे कोण गुंतवणुकीला जाते का ते पाहा. पाकिस्तान, अफगानिस्तानमध्ये कोणी जात नाही. मध्य अशियात देखील दुबई सोडून कुठे जाण्याचा विचार करत नाही. त्यामुळे धर्माला प्राधान्य देणारे देश मागे राहिले. तर सर्वधर्मसमभाव पाळणारे अमेरिका, युरोप खंड, ब्राझील, जपान, न्युझीलंड हे देश पुढे गेले, असे जयंत पाटील म्हणाले.

जनगणेनंतर आता पुढची लढाई...

जातीनिहाय जनगणनेनंतर आता आमचा पुढचा आग्रह असेल ज्याचा जेवढा हिस्सा असेल तेवढा त्याला न्याय मिळाला पाहिजे. बजेट, जागांमध्ये, आरक्षणामध्ये असेल त्यामध्ये हिस्सा मिळाला पाहिजे. त्यासाठी 50 टक्केची जी मर्यादा आहे ती काढली पाहिजे. इंडिया आघाडीच्या धोरणातील तो प्रमुख मुद्दा होता. जातीनिहाय जनगणना म्हणजे त्याचे पहिले पाऊल पडले आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो, असे जयंत पाटील म्हणाले.

sarkarnama
sarkarnamasarkarnama

महिला मुख्यमंत्री झाली पाहिजे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित 'गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025' कार्यक्रमात आजी- माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला. त्याची माहिती ट्विटरद्वारे देताना अजित पवार यांनी म्हटले की, या पुरोगामी आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्राची मुख्यमंत्री ही महिला भगिनी झाली पाहिजे, अशी आमची धारणा आहे. अनेक वेगवेगळ्या समाजाचे लोक या ठिकाणी राहतात. राज्य पुढे नेत असताना आपल्या मराठी माणसावर कुठेही अन्याय होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेत आहोत.

Jayant Patil attacked dcm Ajit Pawar
Omar Abdullah Meets PM Modi : भारत पाकविरोधात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असतानाच ओमर अब्दुल्ला यांनी घेतली PM मोदींची भेट, नेमकी चर्चा काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com