
1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे.
याआधी 15 ऑगस्ट ही अंतिम तारीख होती आणि त्यानंतर दंडाची तरतूद होती.
आता ही प्लेट बसविण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
HSRP Number Plate : राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट बसवणं अनिवार्य केले आहे. यापूर्वी 15 ऑगस्टपर्यंत प्लेट बसविण्यासाठीची अंतिम मुदत होती. या दिवसापर्यंत प्लेट न बसवणाऱ्या वाहनधारकांना दंड होणार होता. पण अजूनही लाखो वाहनधारकांनी प्लेट बसविलेल्या नाहीत. यामुळे अंतिम मुदत वाढविण्याची मागणी सुरु होती. याची दखल घेत राज्य सरकारने लाखो वाहनधारकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्य सरकारने याआधी निर्णय घेत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) प्लेट बसवणे बंधनकारक केले होते. तर याची मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत दिली होती. मात्र जुन्या वाहनधारकांकडून याला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे आता समोर आले आहे. यामुळे उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पाटी बसविण्याकरिता मुदत वाढ देण्यात आली आहे. याबाबतचे नवे आदेश सरकारने काढले आहेत.
HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी http://transport.maharashtra.gov.in या परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत नोदणी करता येणार आहे. त्यामुळे नंबर प्लेट न बसवलेल्या लाखो वाहनधारकांना पुन्हा एक संधी मिळाली आहे. आता दिलेल्या मुदतवाढीत वाहनधारकांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घ्यावी लागणार आहे.
मुदतीनंतर कारवाई होणार
लाखो वाहनधारकांना आता जवळपास साडे तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. पण जे या मुदतीमध्येही एचएसआरपी नंबर प्लेट बसवणार नाहीत त्यांच्यावर 1 डिसेंबरपासून कारवाई केली जाणार आहे. पण यातून ज्यांनी अपॉइंटमेंट घेतली आहे, त्यांना वगळले जाणार आहे.
प्र. 1: HSRP नंबर प्लेट कोणासाठी अनिवार्य आहे?
उ. 1: 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या सर्व वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट अनिवार्य आहे.
प्र. 2: आधी अंतिम तारीख कोणती होती?
उ. 2: याआधी अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2025 होती.
प्र. 3: नवीन अंतिम तारीख कोणती आहे?
उ. 3: नवीन अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.