Maharashtra Governor News: मोठी बातमी: महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली नियुक्ती

Maharashtra New Governor News : देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यामुळे सीपी राधाकृष्णन यांनी सप्टेंबर 2025 मध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला होता. 31 जुलै 2024 पासून त्यांनी ही जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सोपवला होता
Maharashtra New Governor
Maharashtra New Governor Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra News: देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यामुळे सीपी राधाकृष्णन यांनी सप्टेंबर 2025 मध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला होता. 31 जुलै 2024 पासून त्यांनी ही जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सोपवला होता. पण आता जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली. याबाबतचे आदेश गुरुवारी(ता.5 मार्च) राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी दिले आहेत. जिष्णु देव वर्मा यांचा जन्म 15 ऑगस्ट 1957 आहे. तेलंगणाच्या राज्यपालपदाची त्यांच्याकडे 31 जुलै 2024 पासून जबाबदारी सांभाळत होते.

ते तेलंगणाचे ३ रे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. जिष्णु देव वर्मा हे भारतीय राजकारणी असून ते त्रिपुराचे आहेत. आणि त्यांनी यापूर्वी 2018-23 या कालावधीत त्रिपुराचे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. ते बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रमुख होते.

सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदी निवडून आल्यानंतर राज्यपालपद सोडले होते. यानंतर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचे कार्यवाहक राज्यपाल म्हणून कार्यभार सोपवण्यात आला होता. सीपी राधाकृष्णन यांनी 31 जुलै 2024 ते सप्टेंबर 2025 या काळात महाराष्ट्राचे राज्यपालपदाची पदभार सांभाळला होता.

Maharashtra New Governor
Governor Resign: खळबळजनक! एकाच दिवशी पश्चिम बंगालचे राज्यपाल अन् लडाखच्या उपराज्यपालांचे तडकाफडकी राजीनामे

एकाच दिवशी दोन राज्यांच्या राज्यपालांनी राजीनामा दिल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस आणि लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता या दोन राज्यपालांनी गुरुवारी (ता.5 मार्च) राजीनामे दिल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरच पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी साडेतीन वर्षांत तर महिन्यांतच राजीनामा दिल्यानं देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com