Jitendra Awhad Politics: 'शरद पवारसाहेबांच्या दारात मला दोन माणसं घेऊन गेली...', जितेंद्र आव्हाडांनी सांगितली आठवण

Jitendra Awhad adid Padmasinh Patil Suresh Kalmadi Sharad Pawar : जितेंद्र आव्हाड आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे की, मला खरतर शरद पवारसाहेब यांच्या दारात दोन माणसे घेऊन गेली त्यांना मी कधीही विसरु शकत नाही.
Jitendra Awhad Sharad pawar
Jitendra Awhad Sharad pawarsarkarnama
Published on
Updated on

Jitendra Awhad News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या फेसबूकवरून डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या सुरुवातीच्या काळापासून पद्मसिंह पाटलांनी आपल्याला कशी मदत केली याचा उल्लेख आव्हाड यांनी केला आहे. आपल्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी शरद पवारांकडे आपल्या कोण घेऊन गेले याचा उल्लेख त्यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे की, मला खरतर शरद पवारसाहेब यांच्या दारात दोन माणसे घेऊन गेली त्यांना मी कधीही विसरु शकत नाही. एक म्हणजे डॉ. पद्मसिंह पाटील आणि दुसरे म्हणजे सुरेश कलमाडी.

आव्हाड यांनी पद्मसिंह पाटलांविषयी लिहिले आहे की, 'सन 1991 साली शरद पवारसाहेबांविरुद्ध महाराष्ट्रात काही जणांनी बंड केले.त्या बंडाला सामोरे जाताना मी त्यांना बघितले.एखाद्या कार्यकर्त्याने जे करावं ते डॉक्टर साहेब करत होते. आपल्या वयाचा विचार न करता त्यांच वागण मी स्वत:च्या डोळ्याने बघीतले आहे. काँग्रेसच्या एका नेत्याचा हात पकडून फक्त दाबला तर त्या नेत्याच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणजे कुठल्या ताकतीने तो हात दाबला गेला असेल याचा विचार आपणच करावा...'

Jitendra Awhad Sharad pawar
Girish Mahajan Vs Eknath Khadse : खडसेंच्या प्रहारांसमोर महाजनांच नमतं? वरिष्ठांच्या सूचना असल्याची कुजबूज?

मुख्यमंत्रि‍पदाची संधी हुकली...

आव्हाड यांनी पद्मसिंह पाटील यांची मुख्यमंत्रि‍पदाची संधी हुकल्याच्या आठवण देखील सांगितली आहे.'शरद पवारसाहेब संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला गेले. जाताना इथे मुख्यमंत्री कोण याची स्पर्धा सुरु झाली. शरद पवारसाहेबांच्या जवळ असलेल्या प्रत्येकाला वाटत होते कि डॉक्टर साहेबांनी मुख्यमंत्री व्हाव. मला त्यावेळस हे गट तट काही माहितीच नव्हते. पण, त्यांच्या जवळ असल्याकारणाने मलाही वाटत होते की त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं... तसे त्यांनी संध्याकाळी मला सांगितले देखील कि, सकाळी लवकर ये आपले नाव होईल असं वाटतय. पण, नंतर जे काही झाले ते वेगळेच होते. आणि सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री झाले.', असे आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आईला उचलून घेऊन खाली आणायचे

हे सगळं असताना देखिल त्यांची मातृभक्ती ही वाखणण्याजोगी होती. एवढा मोठा कॅबिनेट मिनिस्टर, त्यांचा संपूर्ण राजकीय वर्तुळातील दरारा हे सगळं असताना त्यांच्या आईला ते दररोज संध्याकाळी फिरायला घेऊन जायचे. त्यांच्या बिल्डिंगला लिफ्ट नव्हती. आई तिसऱ्या माळ्यावर भावाबरोबर राहायची. डॉक्टर साहेब तीला स्वतःच्या पाठीवर उचलून घेऊन खाली आणायचे. आणि फिरायला घेऊन जायचे व परत उचलून घेऊन घरी आणून सोडायचे. हे सगळ एका माणसाच्या व्यक्ती चारित्र्यामध्ये असणं ह्याच मला आश्चर्यच वाटत.

Jitendra Awhad Sharad pawar
Maratha Marriage Code of Conduct : वैष्णवी हगवणेचा हुंडाबळी; आता लग्नसोहळ्यासाठी आचारसंहिता, शिवरायांच्या आरतीसह 'या' प्रथांना बंदी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com