मुंबई : शिरुर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी एका चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका केली आहे. यावरुन सध्या नवा वाद निर्माण झाला आहे. अमोल कोल्हेंवर काही जणांची टीका केली आहे, तर काहींनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केलं आहे. याच वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी अमोल कोल्हे यांच्या भूमिकेकडे कलाकार म्हणून पाहिले पाहिजे असे म्हणत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Sharad Pawar React on Amol Kolhe)
मात्र शरद पवार यांच्या याच भूमिकेशी असहमत असल्याचे सांगत अमोल कोल्हेंचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलाताना पटोले यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पटोले पुढे म्हणाले, अमोल कोल्हे आता कलाकार नाहीत तर लोकप्रतिनिधी आहेत. गोडसे विचाराला ताकद मिळणे म्हणजे देशविघातक विचारांना ताकद मिळण्यासारखे आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीला कोणीही ताकद देवू नये, त्यांना हिरो बनवू नये. या देशाला गांधी विचारच तारू शकतात. याच विचारांवर देश महासत्ता होवू शकतो. त्यामुळे या वादात शरद पवारांनी यात लक्ष घालावे. जर चित्रपट प्रदर्शित झाला तर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका दिसून येईल, असेही पटोले म्हणाले.(Why I Killed Gandhi News)
शरद पवार काय म्हणाले होते?
शरद पवार म्हणाले, ''अमोल कोल्हे यांच्या भूमिकेकडे कलाकार म्हणून पाहिले पाहिजे. रामराज्य सिनेमा असेल यामध्ये रावणाची भूमिका करणारी व्यक्ती ही रावण असू शकत नाही. सीतेचं त्याने अपहरण केलं म्हणजे त्या कलाकाराने अपहरण केलं असं होतं नाही. अमोल कोल्हे आमच्या पक्षात नवीन आहेत. कलावंत म्हणून त्यांनी भूमिका केली असेल तरी ते गांधी विरोधी आहेत, असा त्याचा अर्थ होत नाही. नथुरामचे महत्व वाढवायचा कोणताही प्रयत्न नाही. कलावंत म्हणून मी कोणत्याही कलावंताचा सन्मान करतो. (Why I Killed Gandhi)
भाजपने अमोल कोल्हे यांच्या भूमिकेला विरोध केला आहे, याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना पवारांनी "भाजप कधीपासून महात्मा गांधींजींची बाजू घेऊ लागला,'' असे म्हणत भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला टोला लगावला. ''भाजप हे गांधीवादी कधीपासून झाले? भाजपच्या संघ आणि त्यांचा इतिहास सर्वांना माहिती आहे. एक काळ असा होता की गांधींबाबत वेगळी भूमिका घेणाऱ्या ज्या शक्ती होत्या त्या शक्ती सध्या कुठे आहेत बघितलं पाहिजे, त्यावर त्यांनी बोलावं,'' असाही टोला त्यांनी लगावला. (Why I Killed Gandhi News)
''छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत जो औरंगजेबाची भूमिका करतो. त्यात तो मुघलांचा समर्थक होत नाही, किंवा राम -रावणाच्या भूमिकेत रावणाची भूमिका करणाऱ्याने सीतेचं अपहरण केलं असं होत नाही,'' असं पवार म्हणाले. दरम्यान एका बाजूला पवारांनी जरी कोल्हे यांची पाठराखण करणारी भूमिका घेतली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनच त्यांना विरोध होत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे नेते अॅड. भूषण राऊत यांनी कोल्हे यांच्या विरोधी भूमिका घेतली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.