KDMC News : कल्याण डोंबिवली महापालिका नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असते. या महापालिकेच्या कामाची चर्चा तर नेहमीच होत असते. भ्रष्ट अधिकाऱ्यांना रंगेहात पकडल्याच्या घटनाही अनेक वेळा घडल्या आहेत. विरोधकांनी तर कल्याण-डोंबिवली महापालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण असल्याचाही आरोप केला होता. त्यात आता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या एका वादग्रस्त निर्णयाची शहरात चांगलीच रंगली आहे. स्वातंत्र दिनी म्हणजे 15 ऑगस्टला महापालिकेने चिकन, मटन विक्रीला बंदी घातली आहे. तसेच कत्तल खाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्व लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. 14 ऑगस्टला रात्री 12 पासून 15 ऑगस्ट रात्री 12 पर्यंत प्राण्यांची कत्तल करु नये, असे आदेश महापालिकेने दिले आहेत. शिवाय मांस विक्रीही या दिवशी करू नये असे महापालिकेनं सांगितलं आहे.
जनावरांची कत्तल आणि मांसविक्री केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा महापालिकेच्या परवाना विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी दिला आहे.जनावरांची कत्तल अथवा मांसविक्री केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमा नुसार कारवाई करण्यात येईल असे देखील महापालिकेकडून सूचित केले आहे.
जनावरांची कत्तल तसेच मासंविक्री बंदी विषयी कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्व शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या विक्रेत तसेच मोठ्या जनावरांची कत्तल, मांसाची विक्री करणाऱ्या खाटीक आणि कसाई असलेल्या अधिकृत परवानाधारकांना कळविण्यात आले आहे, असे उपायुक्त कांचन गायकवाड यांनी सांगितले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 15 ऑगस्टला मांस विक्री बंदवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. आव्हाड म्हणाले, कल्याण-डोंबिवलीत मांस विक्री बंद करायला यांच्या बापाचे राज्य आहे का? बहुजन समाजाचा डीएन मांसाहारी आहे. मनुष्य प्राण्याच्या दातची रचना बघितली तर कोणीही सांगेल मांसहारी आहे.
ज्या दिवशी देशाला स्वतंत्र मिळाले त्याच दिवशी आमचं स्वतंत्र हिरावून घेत आहात. हा काय तमाशा आहे? कल्याण- डोंबिवलीत बहुजन समाजाला विरोध करण्यासाठी आहे. माझं तर विचार आहे त्या ठिकाणी मटणाची पार्टी ठेवावी. मी त्या दिवशी कोणाच्या तरी घरी जाऊन मटण मच्छी खाणार आहे. हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा, असे चॅलेंज जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.