धक्कादायक : साईलचा नंबर वानखेडेंच्या नावाने सेव्ह ; गोसावीचा कारनामा

गोसावी हा समोर बसलेल्या व्यक्तीला आपण वानखडे (Sameer Wankhede)यांच्याशी बोलत असल्याचे भासवण्यासाठी 'सर, सर' करीत मोबाइलवर प्रभाकरशी (Prabhakar Sail) बोलत असे, अशी माहितीही प्रभाकर साईलनं एनसीबी (NCB)आणि पोलिसांना दिली आहे.
Sameer Wankhede,Prabhakar Sail,Kiran Gosavi
Sameer Wankhede,Prabhakar Sail,Kiran Gosavisarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणानंतर किरण प्रकाश तथा के. पी. गोसावी (वय ३६, रा. ठाणे) याचे (Kiran Gosavi) अनेक प्रताप तपासात समोर येत आहेत. नोकरीचे आमिष दाखवून अनेक तरुणांना किरण गोसावीने यापूर्वी लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. तर लोकांची दिशाभूल करण्यासाठी किरण गोसावीनं एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या नावाचा गैरवापर करीत असल्याचे तपासात समोर आले आहे.

अभिनेता शाहरुख खानची मॅनेजर पुजा ददलानीशी भेटीदरम्यान किरण गोसावीने (Kiran Gosavi) या प्रकरणातील पंच प्रभाकर साईलला (Prabhakar Sail) आपल्या मोबाईलवर फोन करायला सांगितलं होतं. गोसावीने त्यावेळी साईलचा नंबर आपल्या मोबाईलमध्ये समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या नावाने सेव्ह केला होता.

Sameer Wankhede,Prabhakar Sail,Kiran Gosavi
अनिल देशमुखांच्या सुनावणीच्या वेळी सुप्रिया सुळे न्यायालयात उपस्थित

प्रभाकर साईलशी बोलताना गोसावी हा समोर बसलेल्या व्यक्तीला आपण वानखडे (Sameer Wankhede)यांच्याशी बोलत असल्याचे भासवण्यासाठी 'सर, सर' करीत मोबाइलवर प्रभाकरशी (Prabhakar Sail) बोलत असे, अशी माहितीही प्रभाकर साईलनं एनसीबी (NCB)आणि पोलिसांना दिली आहे.

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरण ज्या दिवशी घडले. त्या दिवशी गोसावी आणि समीर वानखेडे यांच्यात कोणत्याही प्रकारे कॉलवर संभाषण झालेलं नसल्याचे मुंबई पोलिसांची SIT आणि NCB च्या vigilance team च्या चौकशीत समोर आलं आहे. त्यामुळे याप्रकरणाला रोज नवे खुलासे होत आहेत. या प्रकरणातील पंच प्रभाकर साईलने एनसीबीकडे सलग दोन दिवस येऊन जबाब नोंदवला. प्रभाकर साईलच्या जबाबामुळे एनसीबीच्या तपासाला वेग आला आहे. या प्रकरणातील दुसरा पंच के .पी. गोसावीचा ताबा मिळवण्यासाठी एनसीबी न्यायालयात दाद मागणार आहे.

किरण प्रकाश तथा के. पी. गोसावी (वय ३६, रा. ठाणे) हा सध्या पुणे लष्कर पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याने या ड्रग प्रकरणात सुपरस्टार शाहरूख खान याच्याकडून १८ कोटी खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हा डाव त्याच्या एका सेल्फीमुळे फसला. त्यानंतर अशाप्रकारे मुंबई,ठाणे,पुणे येथे फसवणुकीचे गुन्हे त्याने केल्याचे समजले. आखाती देशात नोकरीचे आमिष दाखवून किरण गोसावीने (Kiran Gosavi) भोसरीतील (Pimpri Chinchwad) एका तरुणाला सव्वादोन लाख रुपयांना गंडा घातल्याचे प्रकरण आता समोर आले आहे. त्याबाबत भोसरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा गुरुवारी (ता.११) दाखल करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com