Kirit Somaiya News : किरीट सोमय्यांना मोठा धक्का! तहसीलदारांचा बैठकीवर बहिष्कार

Kirit Somaiya Amravati Tehsildars : किरीट सोमय्या यांनी अमरावती जिल्ह्यातील अनेक तहसील कार्यालयात भेटी देऊन बांग्लादेशी नागरिकांना जन्म दाखले दिले जात असल्याचा आरोप केला आहे
kirit somaiya Meet Divisional Commissioner
kirit somaiya Meet Divisional CommissionerSarkarnama
Published on
Updated on

Kirit Somaiya News : मागील काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या हे अमरावती जिल्हाचे दौरे करत आहेत. मागील सहा महिन्यांत त्यांनी सहा वेळा अमरावती जिल्ह्याचा दौरा केला आहे. बांगलादेशी रोहिंगे मुस्लिम यांना खोटे जन्म -मृत्यू प्रमाणपत्र दिल्याचा आरोप ते करत आहेत. या प्रकरणामध्ये थेट तहसलीदारांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

किरीट सोमय्या यांच्याद्वारे फौजदारी कारवाईबाबत दबाव टाकत असल्याचा आरोप तहसीलदार संघटनेने केला आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या बैठकीवर तहसीलदारांनी बहिष्कार टाकल्याची माहिती आहे.

सोमय्या यांनी अमरावती जिल्ह्यातील अनेक तहसील कार्यालयात भेटी देऊन बांग्लादेशी नागरिकांना जन्म दाखले दिले जात असल्याचा आरोप करत त्या संदर्भात फौजदारी कारवाईची मागणी करतात. शिवाय अर्जदारावर फौजदारी कारवाई करा अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल करेल, अशा प्रकारे दबाव टाकत असल्याचा तहसीलदार संघटनेचा आरोप आहे. या संदर्भात अमरावती जिल्ह्यातील तहसीलदार संघटनेचे अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

kirit somaiya Meet Divisional Commissioner
Girish Mahajan : फडणवीस अजितदादांना आणखी एक धक्का देणार? मंत्री झालेले भुजबळही 'उप' होणार, महाजनांचा मोठा दावा

अंजनाव सुर्जी तालुक्यात 1100 बांग्लादेशी

जानेवारी महिन्यात किरीट सोमय्य यांनी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात 1100 हून अधिक बांगलादेशी व रोहिंग्या मुसलमानांना बनावट कागदपत्र्यांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे दिल्याचा आरोप केला होता. त्याच्या चौकशीसाठी प्रशासनाने समिती देखील गठीत गेली होती. दरम्यान, अंजनगाव सुर्जीच्या तहसीलदारांने हे आरोप फेटाळले होते.

kirit somaiya Meet Divisional Commissioner
Manikrao Kokate Politics: कृषिमंत्री कोकाटे म्हणतात, "प्रत्येक शेतकऱ्याने फाटका सदरा नव्हे कोट घालावा"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com