Kolhapur Mahayuti Rift : कोल्हापूर महायुतीत मतभेद! हातकणंगलेच्या खासदार-आमदारांना डावलले, दोन्ही माने भडकले

Dhairyasheel Mane Ashokrao Mane: महायुतीमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पंचगंगेंच्या प्रदुषणाबाबत झालेल्या बैठकीला हातकणंगलेच्या खासदार-आमदारांना निमंत्रणच देण्यात आले नसल्याचे समोर आले आहे.
Panchganga Pollution Meeting Sparks Tensions in Kolhapur Mahayuti
Panchganga Pollution Meeting Sparks Tensions in Kolhapur Mahayutisarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापुरातील पंचगंगा नदी प्रदूषणाच्या बैठकीला न बोलवल्याने हातकलंगलेचे खासदार आणि आमदार यामध्ये प्रचंड नाराजी पसरले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार आहेत आणि हातकलंगलेचे खासदार आहेत. मात्र हातकलंगलेचे आमदार अशोकराव माने आणि खासदार धैर्यशील माने यांना या बैठकीला निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे आमदार माने यांनी मनातली खदखद बोलून दाखवत महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर आणले आहेत.

पंचगंगा नदी ही हातकणंगले व शिरोळ तालुक्यातूनच अधिक वाहते. या भागांतच प्रदूषणाचा विळखा अधिक आहे. मी व खासदार धैर्यशील माने हे घटक पक्षाचे सदस्य असतानाही आम्हाला डावलून ही बैठक घेतली. यामागे कसले राजकारण सुरू आहे. याचा छडा लावणे गरजेचे आहे, असे मत आमदार अशोकराव माने यांनी व्यक्त केले.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. २५) मुंबईत पंचगंगा नदी प्रदूषण निर्मूलनासाठी बैठक झाली. मात्र, या बैठकीला आमदार माने आणि खासदार धैर्यशील माने, तसेच आंदोलन अंकुशला निमंत्रण नव्हते. याबाबत आमदार माने यांनी नाराजी व्यक्त करून निषेध केला.

Panchganga Pollution Meeting Sparks Tensions in Kolhapur Mahayuti
Shivsena UBT : ठाकरेंच्या आमदाराची संपर्कप्रमुखांच्या बैठकीला दांडी; अंधारेंचा सूचक इशारा, ‘काय संदेश द्यायचा, तो मी दिलाय...’

तसेच यापुढे आम्हाला न विचारता बैठक घेतली, तर याचा निश्चितच जाब विचारला जाईल, माने यांनी सांगितले.

बैठकीला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, आमदार अमल महाडिक यांना निमंत्रित केले होते. या बैठकीदरम्यान उपास्थित होते.

Panchganga Pollution Meeting Sparks Tensions in Kolhapur Mahayuti
Supriya Sule : रक्षाबंधनाच्या दिवशी सुप्रिया सुळे भावूक; अजितदादांचे 'ते' फोटो शेअर करत म्हणाल्या, "तू कुठूनतरी अचानक येशील..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com