Shivsena UBT : ठाकरेंच्या आमदाराची संपर्कप्रमुखांच्या बैठकीला दांडी; अंधारेंचा सूचक इशारा, ‘काय संदेश द्यायचा, तो मी दिलाय...’

Sushma Andhare Solapur Tour : सोलापूर जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संघटनेचा आढावा घेताना सुषमा अंधारे यांच्या चारही बैठकींना बार्शीचे आमदार दिलीप सोपल गैरहजर राहिले. अंधारेंनी सूचक इशारा दिला.
Sushma Andhare-Dilip Sopal
Sushma Andhare-Dilip SopalSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 09 August : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तथा सोलापूरच्या संपर्कप्रमुख सुषमा अंधारे या गेल्या तीन दिवसांपासून पक्षसंघटनेचा आढावा घेत आहेत. संघटनेतील सर्व नेते अंधारे यांच्या बैठकीला उपस्थित होते. मात्र, जिल्ह्यातील बार्शीचे एकमेव आमदार दिलीप सोपल यांनी अंधारे यांच्या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. त्याबाबत खुद्द अंधारे यांनीच ‘माझ्या चारही बैठकांना बार्शीचे आमदार नव्हते,’ असे सांगून

आमदार दिलीप सोपल यांच्या अनुपस्थितीबाबत सुषमा अंधारे म्हणाल्या, कालच्या बैठकीला बार्शीचे आमदार नव्हते. मला वाटतं, माझ्या चारही बैठकांना बार्शीचे आमदार नव्हते. त्या चारही बैठकीच्या काळात त्यांना कदाचित महत्वाची कामं असू शकतात.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना हा पक्ष उभा करताना या पक्षाच्या रचनेत सर्वांत मोठा मान हा शिवसैनिकांचा आहे, असे सांगितले होते. संघटनात्मक ताकद असलेला पक्ष सर्वांत मोठा असतो. परवा सर्वोच्च न्यायालयातही कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्यामुळे विधीमंडळातील पक्षापेक्षा संघटनात्मक पक्ष मोठा असतो, त्यामुळे आमच्याकडे आमदारांपेक्षा जिल्हाप्रमुख मोठा असतो आणि जिल्हाप्रमुख त्या बैठकीला उपस्थित होते.

आमदार सोपल यांनी बैठकीला अनुपस्थित राहून काय संदेश द्यायचा त्यांचा ते देतील. पण मला काय संदेश द्यायचा आहे, तो मी दिला आहे, असा सूचक इशाराही सुषमा अंधारे यांनी दिला. त्या पुढे म्हणाल्या, माझ्या बार्शी आणि मोहोळच्या जिल्हाप्रमुखांकडून काही चूक झाली आणि ती चूक मला जाणवली तर काय संदेश द्यायचा तो मी देईन.

Sushma Andhare-Dilip Sopal
Sunetra Pawar Karad Tour : जिल्हा बॅंक निवडणुकीच्या तोंडावर सुनेत्रा पवार-उंडाळकरांमध्ये बंद दाराआड खलबतं; नव्या समीकरणांच्या चर्चेला उधाण

सोपलांचे महाआघाडीपासून अंतर

आमदार सोपल हे विधान परिषद निवडणुकीपासून महाविकास आघाडी आणि पक्षापासून अंतर राखून वागत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरेंशी त्यांची गट्टी जमल्याचे चर्चा आहे. त्याचे प्रत्यंतर नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आले होते. तसेच, आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही त्यांची भेट झाली आहे.

Sushma Andhare-Dilip Sopal
Manoj Jarange Patil : 'हल्लाबोल होताच एकनाथ शिंदे, उदय सामंतांचा मनोज जरांगेंना फोन; संजय शिरसाटांचे 175 मिस्ड कॉल’

दिलीप सोपल सर्वांत वरिष्ठ आमदार

दरम्यान, आमदार दिलीप सोपल हे सातव्यांदा विधानसभेला निवडून आले आहेत, त्यामुळे संपूर्ण सभागृहातही ते वरिष्ठ म्हणून ओळखले जातात, त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संपर्कप्रमुखांनी बोलावलेल्या बैठकीला ते येण्याची शक्यता कमीच आहे. शिवाय संपर्कप्रमुखांच्या बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवली असली तरी वरिष्ठ आमदार म्हणून पक्षश्रेष्ठींकडून त्याकडे कानाडोळा होण्याचीच अधिक शक्यता आहे.

शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोलापूर जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदी दत्ता माने यांची, तर बार्शीच्या जिल्हाप्रमुखपदी प्रवीण काकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार ओमराजे निंबाळकरांनी पक्ष सोडल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com