Ladki Bahin Yojana : फडणवीस सरकारचा कोकणातील लाडक्या बहि‍णींना मोठा धक्का; तीन जिल्ह्यतील तब्बल 'इतक्या' बहिणी ठरल्या अपात्र

Mahayuti Ladki Bahin Yojana : राज्यात महायुती सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रूपये देण्याचा वादा केला होता. तो अद्याप पूर्ण झालेल्या नाही. मात्र लाडक्या बहिणींना अपात्र ठरवत दणका देण्याचं काम जोरदार सुरू आहे.
CM Fadnavis on Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana Sarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. तर निवडणुकीत यश मिळावे म्हणून 2100 रूपये देण्याचा वादा केला. मात्र आता हा वादा अद्याप पूर्ण झालेल्या नाही. मात्र निकषांच्या कात्रीत अनेक लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे काम सध्या सरकार करत आहे. राज्यात सुमारे 20 लाख लाडक्या बहिणींना वगळण्यात येणार असून ते टप्प्याटप्प्याने केलं जाणार असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नेते आमदार रोहित पवार यांनी केला होता. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली असतानाच छाननीमध्ये कोकणातील तिन्ही जिल्ह्यातील जवळपास 40 हजार लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता सरकारच्या तिजोरीवर ताण देणारी ठरत आहे. अनेक विकासकामांना कात्री लावण्याची वेळ येऊ लागल्याने यावरून कंत्राटदार आणि एसटीला फटका बसल्याचे बोलले जात आहे. आता तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना कात्री लावण्यासाठी निकषांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. यामध्ये छाननी सुरू झाली आहे.

तर राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सुरू असलेल्या छाननीत लाखो महिला अपात्र ठरल्या आहेत. यामध्ये कोकणातील तिन्ही जिल्ह्यांचा देखील समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील छाननीत 7 हजार 753 महिला अपात्र ठरल्या आहेत. जिल्ह्यात या योजनेकरिता 4 लाख 12 हजार 774 इतक्या लाभार्थी महिला पात्र ठरल्या होत्या. पण आता यातील जवळपास 8 हजार बहिणी अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे सरकारचे 1 कोटी 16 लाख रुपयांची बचत होणार आहे.

CM Fadnavis on Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : "आधी 1500 नंतर 500 अन् आता केवळ..."; लाडकी बहीण योजनेबाबत राऊतांचा खळबळजनक दावा

लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर करताना 1500 रूपये मानधन देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे पात्र महिलांकडून अर्ज मागविले. त्यानंतर मानधन देण्यातही आलं. पण आता ही योजना सरकारी तिजोरीवर भार देणारी ठरत असून अनेक योजनांना कपातीचा फटका बसला. यामुळे राज्याचे आर्थिक गणितच कोलमडून गेले आहे. आता पर्यंत सरकारी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर प्राप्त अर्जांची एकूण संख्या 1 कोटी 12 लाख 70 हजार 261 आहे. तर यातील 1 कोटी 06 लाख 69 हजार 139 अर्ज मंजूर झाले आहेत. तर राज्यभरात 6 लाख 1 हजार 122 अर्ज बाद करण्यात आले आहेत. यामुळे आता 6 लाखहून अधिक लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

रत्नागिरीत 7 हजार 753 अपात्र

आता यातून बाहेर पडण्यासाठी शासनाने योजनेच्या लाभार्थींची छाननी सुरू केली. अनेक अटी होत्या. त्यांचे उल्लंघन करून ज्यांनी अन्य योजनेचा लाभ घेतला अशा एक-दोन नव्हे तर 7 हजार 753 लाडक्या बहिणींचा जिल्ह्यात शोध घेण्यात आला आहे. आता यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. ज्यात चारचाकी असलेल्या 1350 बहिणी, 65 वर्षांवरील 1 हजार 387 बहिणी आणि शेतकरी योजनांच्या लाभार्थी असणाऱ्या 2254 महिलांचा समावेश आहे.

सुमारे 15 हजार अर्ज अपात्र

तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अनेक लाडक्या बहिणींना सरकारने दणका दिला असून दोन लाख 8 हजार 980 पात्र अर्जातून 1 लाख एक लाख 94 हजार 43 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. तर तब्बल 14 हजार 937 अर्ज बाद करण्यात आले आहेत.

CM Fadnavis on Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त ठरणार लाडक्या बहि‍णींसाठी लाभदायी; एप्रिल महिन्याचा हप्ता बँकेत जमा होणार

रायगड 15849 अर्ज अपात्र

रायगड जिल्ह्यातही 1 जुलै 2024 ते 17 मार्च 2025 या कालावधीत नारी शक्तीदुत अॅप आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवरुन 3 लाख 49 हजार 919 अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी 3 लाख 48 हजार 619 अर्ज मंजूर झाले असून एकूण 15849 अर्ज अपात्र ठरल्यानं नामंजूर करण्यात आले. तसेच जिल्ह्यात 61 महिलांनी लाभात बसत नसल्याने स्वतःहून आपले अर्ज मागे घेतल्याचेही समोर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com