

पालघर जिल्ह्यातील शाळेच्या मॅरेथॉन स्पर्धेत धाव घेतलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू.
तृतीय क्रमांक पटकावल्यानंतर विद्यार्थिनीला हृदयविकाराचा तीव्र झटका.
घटनेमुळे शाळा परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
Palghar News : सध्या हार्ट अटॅक म्हणजेच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. लहान असो या वयोवृद्ध हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पाच महिन्यांच्या आधीच नशिकमध्ये शाळेच्या गेटवरच सहावीतील मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. तिचे नाव श्रेया कापडी होते तर ती सहावीच्या वर्गात शिकणारी होती. तर आता पालघरमध्ये झालेल्या एका शालेय मॅरेथॉनमध्ये धावल्यानंतर एका १५ वर्षीय विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पालघरच्या तलासरीच्या वेवजी येथील लोकभारती संस्थेच्या भारती अकादमी इंग्लिश स्कूलमध्ये शाळेच्या क्रीडा आयोजित होत्या. यावेळी येथे धक्कादायक प्रकार घडला असून दहावीत शिकाणाऱ्या रोशनी रमेश गोस्वामीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. यानंतर शाळेवर शोककळा पसरली असून सर्वांना धक्का बसला आहे.
दरम्यान या स्पर्धेतील मॅरेथॉनमध्ये रोशनीने तृतीय क्रमांक पटकावला. मॅरेथॉन स्पर्धा पार पडल्यानंतर अवघ्या काही क्षणातच तिला हृदयविकाराचा झटका आला. ज्यात ती जागेवरच कोसळली. यानंतर तिला गुजरातच्या उंबरगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रोशनीला मृत घोषित केलं.
तर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झालेल्या रोशनीला या मॅरेथॉनमध्ये धावल्यामुळे झटका आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
उमेदवाराचा मृत्यू
दरम्यान सध्या राज्यात महानगरपालिकेंच्या निवडणुकीचा धुरळा उडत असताच उमेदवारीवरून महायुतीतील भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत नाराजी नाट्य उघड झाले होते. यावेळी मिरा-भाईंदरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. जावेद पठाण असे या उमेदवाराचे नाव असून त्यांच्या मृत्यूने मिरा-भाईंदरमधील राजकीय वर्तुळ हादरले असून येथे शोककळा पसरली होती.
Q1. मृत विद्यार्थिनीचे नाव काय आहे?
➡️ रोशनी रमेश गोस्वामी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
Q2. ही घटना कुठे घडली?
➡️ तलासरी तालुक्यातील वेवजी येथील भारती अकादमी इंग्लिश स्कूलमध्ये.
Q3. विद्यार्थिनी कशामुळे मृत्यू पावली?
➡️ हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे तिचा मृत्यू झाला.
Q4. ती कोणत्या स्पर्धेत सहभागी होती?
➡️ शाळेच्या क्रीडा स्पर्धेतील मॅरेथॉनमध्ये.
Q5. स्पर्धेत तिचा क्रमांक कोणता होता?
➡️ तिने मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.