Konkan Ncp News : खेडमध्ये घड्याळ्याची टिकटिक मंदावणार; कदम पिता-पुत्र जोरात...

राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव नेमकी कोणती भूमिका घेतात? यावरच राष्ट्रवादीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
Ramdas Kadam-yogesh kadam-NCP
Ramdas Kadam-yogesh kadam-NCPSarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri NCP : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी चार महिन्यांपूर्वीच स्वगृही परतत ठाकरे गटाच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. या पक्षप्रवेशामुळे खेड तालुक्यातील राष्ट्रवादी खिळखिळी झालेली असतानाच त्यात आता अजित पवारांच्या बंडाची भर पडल्याने घड्याळाची गती आणखीनच मंदावणार आहे. या बंडामुळे विचित्र स्थिती निर्माण झाली असून, शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत. (After Ajit Pawar's revolt, NCP's strength in the Khed declined)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव नेमकी कोणती भूमिका घेतात? यावरच राष्ट्रवादीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. माजी आमदार संजय कदम (Sanjay Kadam) यांच्यामुळे राष्ट्रवादीची ताकद कमालीची वाढली होती. शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला यापूर्वी त्यांनीच सुरूंग लावत राष्ट्रवादी काँग्रेसला सुगीचे दिवस प्राप्त करून दिले होते.

Ramdas Kadam-yogesh kadam-NCP
Maharashtra Politic's : राजकीय गाठीभेटींना वेग, फडणवीसांची राष्ट्रवादी नेत्यांसोबत चर्चा;अजित पवार गटाला मिळणार ही मंत्रिपदे

वर्षभरापूर्वी घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर तीनच महिन्यापूर्वी माजी आमदार संजय कदम ठाकरे गटाच्या शिवसेनेत डेरेदाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला छेद मिळाला. खेड तालुक्यात शिवसेना नेते रामदास कदम व आमदार योगेश कदम यांची पकड कायम असून, तालुक्यातील शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या देखील वाढतच असल्याने शिवसेना जोमातच आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेला शह देण्याचाही तितकाच प्रयत्न केला जात असल्याने राजकीय संघर्ष टीपेला पोहचला आहे.

Ramdas Kadam-yogesh kadam-NCP
Bhujbal Vs Rohit Pawar : रोहित पवार आईच्या पोटात होते, त्यावेळी मी आमदार अन्‌ महापौर होतो; छगन भुजबळ यांचा टोला

अजित पवार यांच्या बंडामुळे आता नवी समीकरणे उदयास येणार असल्याने राजकीय वातावरणदेखील ढवळून निघणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी अजूनही ठोस भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com