Pune : आमदार रोहित पवार हे आईच्या पोटात असताना मी आमदार आणि मुंबईचा महापौर होतो. त्यांना राजकारणाचे ज्ञान किती आहे, हे माहित नाही, पण त्यांनी वयाचा विचार करून बोलावे, अशी टीका राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी केली. (Chhagan Bhujbal criticizes Rohit Pawar)
राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाशिककडून पुण्याकडे जात असताना येथील हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी थांबले होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस व समता परिषद यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी कैलास सांडभोर, विनायक घुमटकर, गणेश घुमटकर, सागर सातकर आदी उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले की, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे आईच्या पोटात असताना मी आमदार आणि मुंबईचा महापौर होतो. ते पाच वर्षांचे होते, तेव्हा मी महसूल मंत्री होतो, दहा वर्षांचे होते त्यावेळी मी कॉंग्रेसकडून विरोधी पक्षनेता होतो व शिवसेना-भाजप सरकारच्या विरोधात लढत होतो. ते १५ वर्षांचे होते, त्यावेळी मी शरद पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेत होतो. पक्षाचा प्रांताध्यक्ष झालो होतो. त्यांच्यासारखा मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. त्यांना वाडवडिलांचे पाठबळ होते. माझे गॉडफादर कोणीच नव्हते '
शरद पवार यांचे भाजपबरोबर २०१४ ला सेटलमेंट झाले. त्यानंतर २०१७ आणि २०१९ ला आणि आताही काही महिन्यांपूर्वी सेटलमेंट झाले. मात्र, या सगळ्यात मी कोठेच नव्हतो. मी फक्त मैदानात भाषणे करणार. माझे काम जनतेला मार्गदर्शन करण्याचे आहे, असे भुजबळ म्हणाले.
शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आमच्या शपथविधीला पहिल्या रांगेत बसले. का परतले, माहीत नाही. त्यांना शिरूरच्या पाच आमदारांनी निवडून पाठवले आहे. पुढे काय होईल हे खेडचे आमदार दिलीप मोहिते हेच सांगू शकतील, असे सांगत कोल्हेंना गर्भित इशारा दिला.
जुन्नरचे आमदार अतुल बेनके काही म्हणत असले, तरी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पुढच्या निवडणुकीत असतील. मी कोणत्याच खात्याचा मंत्री होण्यास इच्छुक नाही. मला बिनखात्याचा मंत्री व्हायला आवडेल, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.