Raj Thackeray : राज ठाकरेंचा कोकणातील बडा नेता उदय सामंतांच्या गळाला? नाराजीचा स्टेटस् अन् कदमांनीही टायमिंग साधली

Politics in Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगरचे संकेत पुन्हा दिले आहेत. नुकताच चिपळूणमधील पदाधिकाऱ्यांनी ठाकरे शिवसेना सोडण्याचा निर्णय घेत शिवसेना शिंदे गटाच जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापाठोपाठ आता मनसे नेत्यांच्याबाबत अशा चर्चा समोर येत आहेत.
Raj Thackeray And former Khed municipal head Vaibhav Khedekar, Uday Samant, Ramdas Kadam And yogesh Kadam
Raj Thackeray And former Khed municipal head Vaibhav Khedekar, Uday Samant, Ramdas Kadam And yogesh Kadamsarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उद्य सामंत यांनी ऑपरेशन टायगरला गती दिली आहे. येथे दोन दिवसांपूर्वी चिपळूण मधील पदाधिकाऱ्यांनी ठाकरे शिवसेना सोडण्याचा निर्णय घेत शिवसेना शिंदे गटाच जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापाठोपाठ आता महाराष्ट्र नव निर्माण सेनेतील पदाधिकारीही शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे समोर आले आहे. यामुळे कोकणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंपाचे शक्यता वर्तवली जातेय.

शिवसेना फुटीनंतर आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. एकाच जिल्ह्यात चार शिवसेनेचे आमदार असून एक राष्ट्रवादी (अजित पवार) आणि एकच ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता संपुष्टात आली आहे. उरली सुरलीही सामंत बंधूसह, नीतेश राणे, रामदास कदम आणि राज्यमंत्री योगेश कदम संपवत आहेत.

अशातच येथे उदय सामंत आणि रामदास कदम यांच्या गळाला मनसे नेते माजी खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर लागल्याची चर्चा आहे. येथे एका जाहीर कार्यक्रमात रामदास कदम आणि उदय सामंत यांनी खेडेकर यांना शिवसेनेचे ऑफर दिली होती. ज्यानंतर खेडेकर यांनी काही मनसे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती दिली. त्यामुळे ते पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेला आणखी जोर चढला.

Raj Thackeray And former Khed municipal head Vaibhav Khedekar, Uday Samant, Ramdas Kadam And yogesh Kadam
Raj Thackeray Nashik Visit : दोन दिवसांचा नाशिक दौरा राज ठाकरेंनी तीन तासांतच गुंडाळला ; अचानक मुंबईकडे रवाना, काय कारण?

अशातच आता खेडेकर यांच्या सोशल मीडिया स्टेटसमुळे रत्नागिरीत राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहेत. खेडेकर यांनी 'निष्ठवंतांना पक्षात किंमत नसते' असे स्टेटस ठेवल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाल्या आहेत. तर त्याच्या या स्टेटस् मुळेच ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान राज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील खेडेकर शिवसेनेत आल्यास त्यांचे स्वागतच करू असे भाष्य केलं आहे.

खेड चिंचघरमध्ये झालेल्या जाहीर कार्यक्रमावेळी सामंत यांनी, रामदास कदम यांच्या भाषणाची धागा धरत खेडेकर यांच्या राजकीय प्रवासावर भाष्य केलं होतं. तसेच रामदास कदम हेच खेडेकर यांचा राजकीय गुरू असून त्यांनीच त्यांना राज साहेबांकडे नेले होते. त्यामुळे आपण सगळे एकाच कुटुंबातली माणसं असून कायमस्वरूपी असेच राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तसेच खेडेकर यांना शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिले होते. यानंतरच खेडेकर लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.

Raj Thackeray And former Khed municipal head Vaibhav Khedekar, Uday Samant, Ramdas Kadam And yogesh Kadam
Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: एकत्र येणे, हा उद्धव-राज ठाकरेंसमोरील अखेरचा पर्याय

कोण आहेत वैभव खेडेकर?

वैभव खेडेकर हे खेडचे माजी नगराध्यक्ष असून त्यांचाकडे त्यांच्याकडे मनसेच्या राज्य सरचिटणीस पदाची जबाबदारी आहे. तसेच त्यांचा खेड नगरपरिषद निवडणूकीत मोठा वाटा राहीला असून ते प्रत्येक आंदोलनात अग्रभागी असतात. कोकणात मनसेही त्यांनीच वाढवली आहे. पण आता ते काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेच्या वाटेवर आहेत. ते शिंदे गटास सामिल झाल्यास मनसेला कोकणात मोठा धक्का बसू शकतो. आगामी स्थानिकच्या तोंडावर येथील राजकीय समिकरणे बदलू शकतात. तर या पक्ष प्रवेशाच्या चर्चेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com