खा. कोल्हे रोज भेटणार नाहीत! शरद पवारांनी थेट समोरच सांगून टाकलं...

शरद पवार यांनी नागरिकांनाही तारतम्य बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
Sharad Pawar, Amol Kolhe

Sharad Pawar, Amol Kolhe

Sarkarnama

Published on
Updated on

खेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol kolhe) यांच्या शिरोली फाटा येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्धघाटन केले. यावेळी कार्यालय सुरू केलं असलं तरी रोज खासदार भेटतील, अशी अपेक्षा ठेवू नका, असे शरत पवार म्हणाले. याबाबतचे कारणही शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थितांमध्ये यावरून चर्चा रंगली होती.

खा. कोल्हे हे तालुक्याचेच नव्हे तर मतदारसंघ, जिल्हा, राज्याचे अनेक महत्वाचे प्रश्न लोकसभेत (Lok Sabha) मांडत असल्याचे सांगत पवार म्हणाले, अनेकदा मतदारसंघात दिल्लीत आपला प्रतिनिधी काय करतो याची माहिती नसते. साधारणपणे खासदार झाल्यानंतर लोकांच्या अपेक्षा अधिक असतात. पण त्या अपेक्षा खासदार, आमदार, पंचायत समिती सभापती, गावच्या सरपंचाकडून कोणत्या ठेवाव्यात, याचं तारतम्य पाळण्याची गरज असते. अनेकदा मी पाहतो की, माझ्याकडे पत्र येतात. कुणी राज्याचा, आपल्या भागाचा प्रश्न मांडला तर समजू शकतो. पण अनेकदा गावातील स्थानिक पातळीचे प्रश्न घेऊन येतात. त्याची माहिती आम्हाला नसते.

<div class="paragraphs"><p>Sharad Pawar, Amol Kolhe</p></div>
समीर मेघे कोरोनाबाधित येताच आमदारांचे धाबे दणाणले, पण अजितदादा म्हणतात...

जनसंपर्क कार्यालय काढलं तर त्यामाध्यमातून प्रश्नांची सोडवणूक करणं लोकप्रतिनिधींना शक्य होतं. कोल्हे यांनी खासदार म्हणून कार्यालय उभे केल्याचा मला अभिमान आहे. पण खासदार रोज इथे बसणार नाही. सहा महिने दिल्लीत थांबावं लागतं. त्यामुळे तुम्ही म्हणाल, कार्यालय काढलं पण खासदारांचा पत्ता नाही. कृपा करू हे डोक्यातून काढा. तुमचं जे काही दुखणं असेल तर इथल्या माणसाकडं लेखी द्या. त्यानंतर खासदार पाठपुरावा करतील. त्यासाठी हे कार्यालय तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल, असं पवारांनी स्पष्ट केलं.

मोदींची हुकुमशाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मागे घेतलेल्या तीन कृषी कायद्यांवर शरद पवार यांनी शनिवारी भाष्य केलं. ''केंद्र सरकारने तीन कायदे केले त्या कायद्यात काही गोष्टी व्यवस्थित होत्या तर काही अडचणी तयार करणाऱ्या होत्या. गडबडीने कायदे केले आणि मागेही घेतले, कायद्यांची चर्चा होण्याची गरज आहे, मात्र कायदे करताना त्यावर चर्चा करणार नसेल तर हुकुमशाही आहे,'' अशी टीका मोदी यांचे नाव न घेता पवारांनी केली.

<div class="paragraphs"><p>Sharad Pawar, Amol Kolhe</p></div>
खडसेंच्या धमकीबाबत अजित पवार थेट चंद्रकांत पाटलांनाच विचारणार

शरद पवार यांच्या उपस्थितीत राजगुरुनगर येथे शनिवारी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी पवार बोलत होते. पवार म्हणाले, '' देशात आणि राज्यात शेतीकडे प्राधान्याने पाहायला पाहिजे. पुणे जिल्हा सहकारी बॅक शुन्य टक्के व्याजाने शेतक-यांना कर्ज देऊ शकते, तर इतर ठिकाणी अशा प्रकारे कर्ज देता येईल का, याचा विचार व्हायला पाहिजे. देशातील अनेकांनी सहकार चळवळ उभारली, राज्यातील सहकारी चळवळीमध्ये साहेबराव सातकर यांचे मोठे योगदान आहे. साहेबराव बुट्टे-पाटलांनी शिक्षणाचं वैभव उभारलं. आज याचं रोपटं मोठं झालं, याच ठिकाणी शेतकऱ्यांचा मेळावा होत आहे,'' असे पवार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com