Jayant Patil : पत्रकार मारहाण प्रकरणात जयंत पाटलांना दणका; कोर्टाने दोषी ठरवलं, हमीपत्र देण्यासह ठोठावला दंड

Journalist Harshad Kashalkar Assault Case : शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांना अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना दोषी ठरवत धक्का दिला आहे. तसेच नुकसान भरपाई देण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत.
Court
CourtSarakarnama
Published on
Updated on
Summary
  1. अलिबाग येथील पत्रकार हर्षद कशाळकर यांना मारहाण प्रकरणात शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील दोषी ठरले आहेत.

  2. मुख्य न्यायदंडाधिकारी एम. बी. अत्तार यांनी पाटलांना एक वर्ष चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र आणि पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

  3. या निर्णयानंतर अलिबागसह संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली आहे.

Raigad News : अलिबाग येथील पत्रकार हर्षद कशाळकर यांना मारहाण प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणात शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तर येथील अलिबागच्या न्यायालयात सुनावणी सुरू होती. या प्रकरणात आता न्यायालयाने निर्णय दिला असून जयंत पाटलांना दोषी ठरवले आहे. या प्रकरणात मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एम. बी. अत्तार यांनी एक वर्ष चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र आणि पाच हजारांची नुकसान भरपाई देण्याचे आदेशही जयंत पाटलांना दिले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत मतमोजणी सुरू असताना जिल्हा क्रीडासंकुलातील मतमोजणी केंद्रावर राडा झाला होता. त्यावेळी पत्रकार हर्षद कशाळकर यांना मारहाण झाली होती.

तर ही मारहान जयंत पाटील यांनी केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी 24 मे 2019 मध्ये जयंत पाटील, पंडित ऊर्फ सुभाष पाटील आणि अभिजीत कडवे यांच्यावर अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

Court
Jayant Patil: "निवडणूक आयोगाचा सर्व्हर बाहेरुन ऑपरेट होतोय"; जयंत पाटलांनी व्यक्त केली 'ही' भीती

अलिबाग पोलिस निरीक्षक के. डी. कोल्हे यांनी या प्रकरणाचा तपास करून अलिबाग येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी एम. बी. अत्तार यांच्या न्यायालयात सुरू होती.

ज्यात सुनावणीदरम्यान 13 जणांच्या साक्षी घेण्यात आल्या. ज्यानंतर या प्रकरणात जयंत पाटील यांना न्यायालयाने दोषी ठरवत नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. याचे आता आगामी स्थानिकर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Court
Jayant Patil Politics : 'माझ्या आई-वडिलांबाबत अपशब्द काढले, सगळ्यांना हाणणार', जयंत पाटील प्रचंड आक्रमक; महिन्याभरानंतर मौन सोडले

FAQs :

1. हर्षद कशाळकर कोण आहेत?
हर्षद कशाळकर हे अलिबाग येथील पत्रकार आहेत, ज्यांच्यावर मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता.

2. जयंत पाटील यांच्यावर कोणता आरोप होता?
त्यांच्यावर पत्रकार हर्षद कशाळकर यांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

3. न्यायालयाने काय निर्णय दिला?
अलिबाग न्यायालयाने जयंत पाटील यांना दोषी ठरवत एक वर्ष चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र आणि 5,000 रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

4. या निर्णयाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
हा निर्णय शेकाप आणि जयंत पाटील यांच्या प्रतिमेवर परिणाम करू शकतो आणि राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

5. प्रकरण कोणत्या न्यायालयात सुनावले गेले?
हे प्रकरण अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुनावले गेले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com