आमदार शेखर निकमांबरोबरच भास्कररावांचा मलाही पाठिंबा : सुनील तटकरेंची गुगली

गोविंदराव निकम खासदार असताना त्यांच्या खासदारकीचा उपयोग कसा करून घ्यायचा, हे समजण्याची कुवत तेव्हा आमच्यात नव्हती.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

चिपळूण : रत्नागिरीचे माजी खासदार शिक्षण तथा सहकार महर्षी (कै.) गोविंदराव निकम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. (स्व.) निकम यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. एकमेकांचे कौतुक करताना मारलेल्या कोपरखळींमुळे कार्यक्रमात रंगत आली होती. याच वेळी बोलताना खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी ‘आमदार निकम यांनी विकास कामांसाठी आणलेला निधी नक्कीच दखल घ्यायला लावणारा आहे. त्यांना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भविष्यात खंबीरपणे पाठिंबा देण्याचे मान्य केले आहे, अर्थात तो पाठिंबा मलाही असणार आहे,’ अशी गुगली टाकली. (Along with MLA Shekhar Nikam, Bhaskarrao also supports me : Sunil Tatkare )

सह्याद्री शिक्षण संस्थेच्या खरवते दहिवली येथील मुख्य इमारतीमध्ये निकम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, आमदार भास्कर जाधव यांनी निकम यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Ajit Pawar
हनुमान चालिसा पठणासाठी माझ्या घरी या : भाजप नेत्याचे शिवसैनिकांना आवतण

आमदार शेखर निकम यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेच्या विस्ताराचा आढावा घेतल्यानंतर आमदार भास्कर जाधव म्हणाले, गोविंदराव निकम खासदार असताना त्यांच्या खासदारकीचा उपयोग कसा करून घ्यायचा, हे समजण्याची कुवत तेव्हा आमच्यात नव्हती. युवा रक्त असल्यामुळे आम्ही तेव्हा आक्रमक राहिलो. पण जाधव आणि निकम कुटुंबीयांचे संबंध कधीही बिघडू दिले नाहीत. जेव्हा गोविंदराव निकमांचे कार्य आम्हाला समजले, त्यानंतर त्यांचा अल्पसा सहवास मिळाला.

Ajit Pawar
राणा दांपत्याच्या घराबाहेर गोंधळ घालणाऱ्या सहा शिवसैनिकांना अटक

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘‘(स्व.) गोविंदराव निकम हे शरद पवार साहेबांना दैवत मानायचे. आपण त्यांचे काम अगदी जवळून पाहिले आहे. ते लोकसभेला खासदार म्हणून गेले, तेव्हा ४८ पैकी ३८ खासदार काँग्रेसचे होते. अशावेळी त्यांच्यासोबत सहा महिने काम करण्याची संधी मिळाली होती. शरद पवार यांचाही त्यांच्यावर तितकाच विश्वास होता. वयाच्या २२ व्या वर्षी काही सहकाऱ्यांना एकत्र करून हे रोपटे लावले. जनतेचे देणे लागतो, या भावनेतून काम केले. त्यानंतर कधीही त्यांनी मागे वळून पाहिले नाही. जिल्हा व राज्य सहकारी बँकेमध्ये आम्ही एकत्रपणे काम केलं. एवढेच नव्हे तर त्यांनी येथे साखर कारखाना रुजविण्याचा प्रयत्न केला. परंतु कोकणच्या भौगोलिक रचनेने त्यांना साथ दिली नाही.’’

Ajit Pawar
खासदाराच्या निकटवर्तीयाच्या आमदारकीच्या स्वप्नाने शिवसेनेत ठिणगी; २५ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, ‘‘आमदार निकम यांच्या कामकाज पद्धतीचा नेहमी हेवा वाटतो. विकास कामांसाठी त्यांनी राबवलेल्या निकम पॅटर्नमधून नवीन आमदारांना खूप काही शिकण्यासारखे आहे. आपण मंत्री असतानाही एवढा निधी आणू शकलो नाही. त्यांनी तर दोन वर्षे कोरोनाची परिस्थिती असतानाही मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. महाविकास आघाडीतील अगदी जवळचा आमदार म्हणूनही ओळख निर्माण करत वेगळे राजकीय अस्तित्व जपले आहे.’’

Ajit Pawar
दोन लाखांपेक्षा जादा कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अजित पवारांचे मोठे वक्तव्य

आम्हा खासदारांच्या नशिबी तेही नाही..

खासदार सुनील तटकरे म्हणाले, ‘‘युवक कॉग्रेसचा रायगड जिल्हाध्यक्ष असल्यापासून मी त्यांच्या सहवासात होतो. रत्नागिरी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष, खासदार म्हणून मी त्यांना व त्यांच्या काम करण्याची पद्धत फार जवळून पाहिली आहे. ते फार हट्टी होते. एखादा विषय मनात आणला तर तो पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नव्हते. आमदार म्हणून शेखर निकम यांना ५ कोटींचा निधी तरी मिळाला, आम्हा खासदारांच्या नशिबी तेही नाही.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com