नितेश राणे नॉट रिचेबल; अटकेची शक्यता,पोलिस पथके गोव्यात

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) हल्लाप्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता आहे.
nitesh rane 

nitesh rane 

Published on
Updated on

मुंबई: शिवसेना कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) हल्लाप्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.न्यायालयात त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी त्यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. तर दूसरीकडे नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अटकेसाठी शिवसेनेने (Shivsena) आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मात्र प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या नॉट रिचेबल झाले आहे. कालपासून त्यांचा फोन नॉट रिचेबल येत आहे. संतोष परब हल्लाप्रकणात अटक होण्याच्या शक्यतेने ते गायब झाले असल्याची चर्चा सध्या सुरु आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरु असून पोलिसांची पथके गोव्यातही त्यांच्या शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली आहेत.

<div class="paragraphs"><p>nitesh rane&nbsp;</p><p></p></div>
उद्धव ठाकरे बरे होईपर्यंत फडणवीसांना मुख्यमंत्री पदाचा कार्यभार द्या

काय आहे प्रकरण?

संतोष परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय आणि करंजे गावचे माजी सरपंच आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान 18 डिसेंबरला संतोष परब यांच्यावर हल्ला झाला. इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार शस्त्राने परब यांच्यावर वार केले. या हल्ल्यात परब जखमी झाले. परब यांनी आपल्यावरील हल्ल्याला नितेश राणे यांचे नाव घेतले. त्यानंतर या हल्ल्याच्या तपासाची मागणी शिवसेनेने लावून धरली. तसेच या प्रकरणाला राजकीय शत्रुत्वाच्या संशयावरून नितेश राणे यांच्यासह आणखी काही जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना पकडण्याच यश आले आहे. यातील मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. . सातपुते हा नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता असल्याने या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे स्वत: याप्रकरणाचा तपास करत आहेत.

तर दूसरीकडे, माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. ' विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून म्याव म्याव करत मांजराची नक्कल करत चिडवणारे आता लपून बसलेत. वाघाला घाबरून की न्यायालयाला घाबरुन लपून बसलेत हे माहिती नाही. परंतु गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक पोलिसांना घाबरतात ही वस्तुस्थितीच आहे, असे म्हणत दीपक केसरकर यांनी नितेश राणेंना टोला लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com