Amit Shah Raigad Tour : श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने राजगडावर शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार पुण्यतिधी निमित्त आयोजित कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थितीमध्ये झाला. आपल्या भाषणात अमित शाहांनी मोठा संकल्प केला.
'स्वराजाची संकल्पना ही शिवाजी महाराजांची होती. त्यांनी 200 वर्षांची मुघलांची गुलामगिरी संपवली. स्वातंत्र्यासाठी त्यांचीच प्रेरणा होती. आपल्याला स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आहे.जेव्हा 100 वर्ष होतील तेव्हा भारत जगात एक नंबरवर असले', असा संकल्प अमित शाह यांनी केला.
अमित शाह म्हणाले, 'मी येथे भाषण करण्यासाठी आलो नाही तर प्रेरणा घेण्यासाठी आलो आहे. जेथे महाराजांचे सोन्याचे सिंहासन होते ते जेथे बसत होते तेथे नमन करून मी रोमांचित झालो. आमचे सरकार हे रायगडला फक्त पर्यटनस्थळ बनवणार नाही तर प्रेरणास्थळ बनवेल'
'मी महाराष्ट्राच्या जनतेला विनंती करतो की शिवाजी महाराजांना फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेऊ नका. देश, जग त्यांच्यापासून प्रेरणा घेते. आपल्या स्वातंत्र्याची पहिली लढाई त्यांनी लढली. रायगडापासून प्रेरणा घेऊ नये म्हणून इंग्रजांनी रायगड उद्धवस्थ करण्याचा प्रयत्न केला.', असे देखील अमित शाह म्हणाले.
कार्यक्रमात उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दिल्लीत स्मारक व्हावे, अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी पर्यावरणामुळे अडचण येत असेल तर स्मारक राजभवनाची जागा आहे तेथे उभारावे आणि शिवाजी महाराजांच्या विषयी अवमान करणारे वक्तव्य करणाऱ्यांना अजामिनपात्र शिक्षा करण्याचा कायदा करावा, तसेच शिवाजी महाराजांवरील सिनेमा, कादंबऱ्यांमध्ये ऐतिहासिक सत्याची मोडतोड केली नाही ना हे पाहण्यासाठी सेन्साॅर बोर्ड तयार करावे अशा मागण्या केल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.