Irshalgad Accident News : रायगडमधील इर्शाळवाडीत दरड कोसळून झालेल्या भीषण घटनेची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून, या घटनेची माहिती जाणून घेतानाच सर्व पातळ्यांवर सहकार्य करण्याची भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी घेतली आहे. या संदर्भात शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली. त्यामुळे राज्यातील या घटनेतून सावरण्यासाठी शाह हेही पुढे आले आहेत. (Latest Marathi News)
अमित शाह ट्विट करत म्हणाले, "महाराष्ट्रातील रायगड येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं झालं आहे. एनडीआरएफच्या 4 टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि स्थानिक प्रशासनासह बचाव कार्यात युद्ध पातळीवर सुरू आहे. लोकांना घटनास्थळावरून बाहेर काढणे आणि जखमींवर तातडीने उपचार करणे हे आमचे प्राधान्य आहे."
दरम्यान या घटनास्थळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहचलेले आहेत. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तसेच, या घटनेतील जखमींवरील उपचारांचे खर्च राज्य सरकार करणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब या ठिकाणी आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून, आतापर्यंत 7 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती आहे. जखमींवर उपचाराची व्यवस्था करण्यात आली. रात्री ही घटना घडली होती.
सकाळ होताच वेगाने बचावकार्य सुरू झाले आहे या वसाहतीत आदिवासी ठाकर समाजाची घरे आहेत. खालापूरमधील चौक गावापासून 6 किलोमीटर अंतरावर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात ही आदिवासींचं गाव आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.