रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकींचा धुरळा उडालेला असतानाच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena) पक्षाने रत्नागिरी तालुक्यातील महत्वाच्या नियुक्त्या करण्याचा धडाका लावला आहे. तालुकाप्रमुखपदी महेश उर्फ बाबू म्हाप (Mahesh Mhap) यांची नियुक्ती केल्याचे पालकमंत्री उदय सामंत (Uday samant) यांनी जाहीर केले. (Balasaheb's Shiv Sena's Ratnagiri Taluka Pramukh election of Mahesh Mhap)
बाबू म्हाप हे पालकमंत्री सामंत यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत, त्यामुळे सामंत यांनी आपल्या निष्ठावंतांच्या खांद्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.
रत्नागिरी तालुकाप्रमुख पदावर कुणाची नियुक्ती केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पालकमंत्री सामंत यांनी सोमवारी (ता. 28) रत्नागिरी दौर्यावेळी तालुक्याचा आढावा घेतला आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे वर्चस्व कसे अबाधित ठेवता येईल, या दृष्टीने त्यांनी सूचना केल्या. तसेच तालुकाप्रमुखपदी महेश उर्फ बाबू म्हाप यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले. तसेच पाली-हातखंबा विभागप्रमुखपदी सचिन तथा तात्या सावंत, हातखंबा उपविभागप्रमुखपदी अनिल पाडावे, प्रमोद डांगे यांची निवड केली गेली. पाली उपविभागप्रमुख म्हणून नाणीज सरपंच गौरव संसारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मंत्री सामंतांचे निष्ठावंत शिलेदार
बाबू म्हाप हे पालकमंत्री सामंत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. पंचायत समितीचे सभापतीपद, उपजिल्हाप्रमुख पदावर म्हाप यांची नियुक्ती झाली होती. मिरजोळे जिल्हा परिषद गटातून प्रतिनिधित्व करतानाच त्यांनी बांधकाम सभापतीपदही भूषवले आहे. निष्ठावंत कार्यकर्ते असल्यामुळेच म्हाप यांच्यावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख ही महत्वाची जबाबदारी मंत्री सामंत यांनी दिल्याचे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.