शिवसेनेतील वाद टोकाला : रामदास कदमांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी

त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देतो, बाप बापच असतो.
Ramdas Kadam Banner
Ramdas Kadam BannerSarkarnama
Published on
Updated on

ठाणे : ‘कोकणचा ढाण्यावाघ’ असा उल्लेख करत माजी पर्यावरण मंत्री, आमदार रामदास कदम यांच्या समर्थनार्थ ठाणे शहरात बॅनर लावण्यात आला आहे. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या ‘ऑडिओ क्लिप’वरून कदम यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचे बोलले जात होते, त्यात आता पोस्टरमुळे नवीन वाद पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Banner hoisting in Thane in support of Ramdas Kadam)

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधातील कागदपत्रे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना रामदास कदम यांनी दिल्याचा आरोप होत आहे. त्याबाबतच्या ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. त्यावरून शिवसेना नेतृत्वाची रामदास कदम यांच्यावर खप्पामर्जी झाल्याचे सांगण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात लागलेल्या पोस्टरची चांगलीच चर्चा रंगली आहे.

त्या पोस्टरवर रामदास कदम यांचा मोठा फोटो लावण्यात आला आहे. त्याखाली कोकणचा ढाण्यावाघ असे लिहिण्यात आलेले आहे. तसेच, ‘कालपर्यंत राडा झाल्यावर आम्हाला फोन करणारे लोक आज आमचीच सुपारी द्यायला निघालेत. त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देतो, बाप बापच असतो,’ असा मजूकर त्या पोस्टरवर छापण्यात आला आहे.

Ramdas Kadam Banner
अजित पवारांना १०० कोटी दिलेल्या त्या दोन कंपन्या कुणाच्या? : सोमय्यांचा आरोप

शिवसेना नेते का आहेत रामदास कदमांवर नाराज

मागील काही महिन्यांपासून किरीट सोमय्या हे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या लोकांवर वेगवेगळे आरोप करत आहेत. त्यात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे, परिवहन मंत्री अनिल परब यांना टार्गेट केले आहेत. त्यांच्यावर अवैध रिसोर्ट बांधकामप्रकरणी आरोप केले आहेत. परब यांच्याबाबतची कागदपत्रे रामदास कदम यांना किरीट सोमय्या यांना पुरवल्याचा आरोप होत आहे. त्याबाबतच्या ऑडिओ क्लिप राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम आणि मनसेच्या नेत्याने व्हायरल केल्या आहेत. त्यानंतर कदम यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.

Ramdas Kadam Banner
काँग्रेस आमदार जगतापांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा!

दरम्यान, दसरा मेळाव्याला उपस्थित राहू नये, असा निरोप आल्यानंतर रामदास कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. पक्षात आपल्याविरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. शिवसेनेत ज्यांना मंत्री पदं मिळाली आहेत, असे काही मंत्री त्यांच्या पदाचा गैरवापर हा माझ्यासारख्या जुन्या नेत्यांना संपवण्यासाठी करत आहेत, असंही त्यांनी पत्रात नमूद करण्यात आलं होतं. शिवसेनेतले काही मंत्री आपल्याला साईडलाईन करत आहेत, असं म्हणत रामदास कदम यांनी आपला राग व्यक्त केला होता.

दसरा मेळाव्यात निषेधाच्या घोषणा

दसरा मेळाव्यात उपस्थित नसलेल्या रामदास कदम यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. रामदास कदम मुर्दाबाद, रामदास कदम गद्दार आहेत, अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणापूर्वीच कदम यांच्या निषेधाच्या या घोषणा देण्यात आल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com