काँग्रेस आमदार जगतापांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा!

तुमच्या भावना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोचविण्यात येतील, असे आश्वासन जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले.
काँग्रेस आमदार जगतापांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा!
Published on
Updated on

सासवड (जि. पुणे) : सासवड नगरपालिकेची आगामी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वतःच्या घड्याळ या चिन्हाद्वारे लढवावी, ही तुमची भावना पक्षातील वरीष्ठ पक्षश्रेष्ठींना सांगितली जाईल. पक्षाच्या स्वतःच्या ताकतीवर लढण्याची हिंमत येथे व्यक्त झाली, याचे समाधान वाटते. मात्र, एकजूट दाखविली आणि एकदिलाने लढलो तर सासवड पालिकेत आपली सत्ता येऊ शकते, त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी येथे केले. (NCP workers urge to contest Saswad municipal elections on their own)

सासवड हा काँग्रेस पक्षाचा विशेषतः आमदार संजय जगताप यांचा बालेकिल्ला मानला जातो. येथील नगरपालिका कायम जगताप कुटुंबीयांच्या ताब्यात राहिली आहे. त्या जगतापांच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून आगामी नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा आग्रह जिल्हाध्यक्ष गारटकर यांच्यापुढे धरला. त्यानंतर त्यांनी तुमच्या भावना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोचविण्यात येतील, असे आश्वासन दिले. त्यामुळे नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी खरोखरच स्वबळावर लढवणार की आमदार जगताप यांच्याशी आघाडी करून लढणार, याकडे आता कार्यकर्त्यांसह पुरंदर तालुक्याचे लक्ष असणार आहे.

काँग्रेस आमदार जगतापांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा!
पवार-विखे वादाला तरूणाई मैत्रीत बदलू पाहतेय...

सासवड (ता. पुरंदर) येथील मार्केट यार्ड भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक नगरपालिका निवडणुकीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. त्यात वरील भावना पक्षाचे शहरातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली

राहुल गिरमे यांनी सासवड शहरातील पक्षीय कार्यक्रम, उपक्रम व वाटचाल याचा आढावा दिला. ते म्हणाले की, सासवडला पक्षाची ताकत आहे, हे यापूर्वी आपण काही निवडणुकीत पाहिले आहे. पक्षाची अजून ताकत वाढवून पक्षाचे चिन्ह घराघरांत जावे, याकरीता साऱ्या कार्यकर्त्यांच्या भावनांना पक्षाने बळ द्यावे. नगरसेवक दीपक टकले, नगरसेविका मंगल म्हेत्रे यांनी ताकत लावली, तर नगरपालिकेत पक्षाचे अनेक कार्यकर्ते निवडून येतील, हा आमचा अनुभव आहे.

काँग्रेस आमदार जगतापांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा!
माजी मंत्री भास्कर पाटील खतगांवकरांचा भाजपला रामराम; पुन्हा काॅंग्रेस प्रवेशाची घोषणा

संजय ज्ञा. जगताप, ॲड. खाडे, ॲड. फडतरे, बबन टकले, महेश जगताप यांनीही पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ताकत व संधी द्यावी, सोने करू, असे स्प्ष्ट केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर तालुकाध्यक्ष माणिक झेंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बबन टकले, माजी नगराध्यक्ष दत्तानाना जगताप, ॲड. कला फडतरे, भानुदास जगताप, बंडुकाका जगताप, बाळासाहेब भिंताडे, दीपक म्हेत्रे, संतोष जगताप, ॲड. प्रकाश खाडे, पहिलवान विनोद जगताप, गिरीश जगताप, महेश जगताप, अतुल जगताप, दत्तोबा जगताप, मनिष रणपिसे, नीता सुभागडे, मनोहर जगताप आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com