Bazar Samiti Result : वसई बाजार समितीवर आमदार ठाकूरांनी सत्ता राखली!

Bazar Samiti News : निवडणुकीपूर्वीच ठाकूरांनी अर्धी लढाई जिंकली होती.
Bazar Samiti Result :
Bazar Samiti Result :Sarkarnama

Vasai Virar Bazar Samiti : वसई कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा एकदा वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांच्या बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. आज झालेल्या 11 जागांच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा बहुजन विकास आघाडीने जिंकल्या आहेत. निवडणुकीपूर्वीच ठाकूरांनी अर्धी लढाई जिंकली होती. 6 जागा बिनविरोध आल्या होत्या. त्यात 5 जागा बहुजन विकास आघाडी आणि एका जागेवर भाजप प्रणित उमेदवार निवडून आला होता.

या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या विरोधात सर्व पक्षाची तयारी झाली होती. असे असताना देखील या ठिकाणी पुन्हा बहुजन विकास आघाडीने (Bahujan Vikas Aghadi) बाजार समिती आपल्याकडे राखण्यात यश मिळविले आहे. वसई विरार मध्ये सद्या महानगरपालिका, पंचायत समिती अनेक पतसंस्था, सहकार क्षेत्रातील बँका यावर बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता आहे.

Bazar Samiti Result :
Karnataka Election : मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती कुणाला? कानडी जनतेचा कौल काय?

वसई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकी पूर्वीच ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु राज्यात झालेले सत्तांतर यामुळे भाजपने इतर पक्षांना बरोबर घेऊन निवडणुकीत भाजपचे राजेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जाण्याचे धोरण अवलंबले आहे. यामुळेच ही निवडणूक संपन्न झाली.

निवडणुकीपूर्वीच बहुजन विकास आघाडीने 5 जागा जिंकून निवडणुकीत आघाडी घेतली होती. तर एक जागा भाजपला मिळाली होती. आज 11 जागा साठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी संद्याकाळी 5.30 वाजता सुरु झाली आणि सात वाजता संपली. या मध्ये बहुजन विकास आघाडीने 11 च्या 11 जागा जिंकून विरोधकांना बाजार समितीतून लांब ठेवले आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप, श्रमजीवी संघटना, शिवसेना असे विरोधी पक्ष एकत्र आले होते. परंतु कार्यकर्त्यांचे जाळे आणि शिस्तबद्ध प्रचार आणि सहकार, ग्रामपंचायत क्षेत्रात असलेले बहुजनचे प्राबल्य या जोरावर बहुजन ने ही निवडणूक सहज जिंकली आहे.

Bazar Samiti Result :
Paithan APMC Election : पैठण बाजार समितीवर मंत्री भुमरेंची सत्ता कायम राहाणार का ?

दरम्यान, नवनिर्वाचित अशोक कोलासे कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य विजयाचे श्रेय आमदार ठाकूरांना दिले. "समितीच्या इमारतीचे काम जागेअभावी रखडले होते, ते वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका, राज्य शासन आणि पणन महामंडळ यांच्या माध्यमातून मार्गी लावणार आहोत. इमारत झाल्यानंतर त्याचा फायदा येथील व्यापारी, शेतकरी यांना होणार आहे , कोलासे म्हणाले.

Bazar Samiti Result :
Lasur APMC Result News : आमदार बंब-बोरनारे जोडीने लासूर बाजार समिती जिंकली, ठाकरे गटाला दोन जागा..

विजयी उमेदवार :

रवींद्र पाटील , अरुण भोईर, चंद्रकांत भोईर , पांडुरंग पाटील, कजिशोर किणी प्रणय कासार, अशोक कोलासो , मोरेश्वर पाटील,किरण पाटील,हरीश पाटील आणि जोसेफ प्रेररा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com