Lasur APMC Result News : आमदार बंब-बोरनारे जोडीने लासूर बाजार समिती जिंकली, ठाकरे गटाला दोन जागा..

Bjp : कृष्णा पाटील डोणगांवकर यांच्या पॅनलने गंगापूर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत बंब यांचा धुव्वा उडवला होता.
Lasur APMC Result News
Lasur APMC Result NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Smabhajinagar : लासूर बाजार समिती निवडणुकीत (Lasur APMC Result News) भाजप आमदार प्रशांत बंब आणि वैजापूरचे ठाकरे गटाचे आमदार प्रा.रमेश बोरनारे यांच्या युतीने १४ जागांसह बहुमत मिळवले. तर ठाकरे गटाचे कृष्णा पाटील डोणगांवकर व राष्ट्रवादीच्या शिवशाही पॅनलला फक्त दोन जागा जिंकता आल्या. काॅंग्रसेने स्वतंत्र पॅनल उभे केले होते, मात्र त्यांना खातेही उघडता आले नाही. तर दोन अपक्षांनीही निवडणुकीत विजय मिळवला.

Lasur APMC Result News
Renapur APMC Result News : लातूरनंतर रेणापूरातही देशमुखांचाच डंका, बिनविरोधसह सर्व १७ जागांवर विजय..

काही महिन्यापुर्वी कृष्णा पाटील डोणगांवकर यांच्या पॅनलने गंगापूर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत धुव्वा उडवला होता. कारखान्याचे अध्यक्ष राहिलेल्या आमदार बंब (Prashant Bamb) यांचा देखील या निवडणुकीत पराभव झाला होता. (Bjp) कृष्णा पाटील यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकत आमदार बंब यांना दणका दिला होता. लासूर बाजार समितीच्या निमित्ताने बंब यांनी कारखान्याच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची परतफेड केल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.

लासूर हे आमदार बंब यांचे गाव असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची बनली होती. त्यांनी शिवसेना (शिंदे गट) आमदार प्रा. रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांच्या सोबत युती करून निवडणूक लढवली. तर कृष्णा पाटील डोणगावकर यांनी राष्ट्रवादीसोबत आघाडी करून ही निवडणूक लढवली. ऐनवेळी माजी राज्यमंत्री अशोक पाटील डोणगावकर यांचे चिरंजीव तथा मध्यवर्ती बँकेचे संचालक किरण पाटील डोणगावकर यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतर पॅनल उतरवले.

मात्र त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. या तिसऱ्या पॅनलने अनेक ठिकाणी निर्णायक मते मिळवत निवडणुकीचे गणित बिघडवले. याचा थेट फायदा बंब-बोरनारे जोडीच्या पॅनलला झाला. भाजप- शिवसेना (शिंदे गट) यांचे चौदा उमेदवार विजयी झाले. यात सहकारी संस्था : संभाजी जगताप, अशोक जगताप, मनीष पोळ, आप्पासाहेब जगदाळे, विलास सोनवणे, संजय केरे, संगीता चिंधे, ज्योती कुऱ्हाडे, शेषराव जाधव.

ग्रामपंचायत मतदार संघ- संतोष जाधव, रितेश मुनोत, अनिल चव्हाण, सुरेश जाधव. व्यापारी मतदारसंघ-प्रकाश मुथा, सुबोध मुथा. हमाल मापारी- सुनील पाखरे विजयी झाले. तर ठाकरे गटाचे दिनेश मुथा, नंदकुमार रवींद्र हे सहकारी संस्था मतदारसंघातून निवडून आले. व्यापारी मतदारसंघात प्रकाश मुथा व सुबोध मुथा या अपक्षांनी विजयश्री खेचून आणली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com