Sindhudurg Politics : भारत संकल्प यात्रेवरून वाद; कुडाळमध्ये राडा

Uddhav Thackeray Shiv sena Workers Protest Against Bjp In Kudal : विकास रथावर "मोदी सरकार" असा उल्लेख असल्याने महाविकास आघाडीच्या नगरसेवकांचा विरोध...
Sindhudurg Politics News
Sindhudurg Politics NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics Latest News : केंद्र सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी गावागावात सुरू असलेल्या विकास भारत संकल्प रथयात्रेवर मोदी सरकार असा उल्लेख आहे. यामुळे या रथयात्रेला कोकणातही अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जोरदार विरोध होत असल्याचे चित्र आहे.

कुडाळ येथे शुक्रवारी (ता.29) असाच विरोध झाला आहे. एक दो एक दो मोदी सरकार फेक फेक दो..., उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है..., महाविकास आघाडीचा विजय असो..., अशा जोरदार घोषणा देत कुडाळ येथे मोदी सरकारच्या रथाला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत विरोध केला आहे. ठाकरेंचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भूमिकेला भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आक्षेप घेत दोन्ही बाजूच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धक्काबुक्कीचा प्रयत्न केला.

Sindhudurg Politics News
Sindhudurg Politics : राणेंच्या बालेकिल्ल्यात तुफान राडा, घोषणाबाजीत ठाकरेंच्या आमदाराने नारळ फोडलाच

विकसित भारत संकल्प यात्रा शुक्रवारी कुडाळ शहरात दाखल झाली. त्या यात्रेत विकास रथावर "मोदी सरकार" असा उल्लेख असल्याने आमचा यात्रेला विरोध आहे, असे कुडाळ नगरपंचायतमधील ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या सत्ताधारी नगरसेवकांनी म्हटले. या सगळ्याला भाजप नगरसेवकांनी याला जोरदार आक्षेप घेतला आणि जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी भाजप कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार बाचाबाची होऊन धक्काबुक्की झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार झाले. यामुळे कुडाळ नगरपंचायत पटांगणावर मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र होते. अखेर कुडाळ पोलिसांनी व दंगल नियंत्रण पथकाने हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याच विषयावरून चार दिवसांपूर्वी कुडाळ नगरपरिषदेची सभाही वादळी ठरली होती. विकसित भारत संकल्प यात्रा येत्या 29 डिसेंबर रोजी कुडाळ शहरात येणार आहे. त्या यात्रेत विकास रथावर मोदी सरकार असा उल्लेख असेल तर आमचा यात्रेला विरोध राहील, असे कुडाळ नगरपंचायतमधील महाविकास आघाडीच्या सत्ताधारी नगरसेवकांनी म्हटले. भाजप नगरसेवकांनी याला जोरदार आक्षेप घेतला. दरम्यान 'भारत सरकार' असा उल्लेख असेल तर आमचे या कार्यक्रमाला सहकार्य राहील, असे उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी सांगितले. या दोन्ही मुद्द्यावरून सभागृहात जोरदार गदारोळ होऊन दोन्ही बाजूचे नगरसेवक आक्रमक झाले होते.

नगरपरिषदेमधील याच वादाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ पोलिसांनी उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक मंदार शिरसाट, निलेश परब, गणेश भोगटे, संध्या तेरसे, उदय मांजरेकर यांच्यासह कुडाळ नगरपंचायतमधील सत्ताधारी व विरोधक नगरसेवकांना नोटीसा बजावल्या होत्या. अखेर आज ही यात्रा प्रत्यक्ष कुडाळ नगरपरिषदेच्या पटांगणावरती आल्यावर मोठा वाद झाला. त्यामुळे आता कुडाळ पोलीस प्रशासन व तालुका प्रशासन कोणती भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Edited by sachin Fulpagare

Sindhudurg Politics News
Bharat Gogawale:..म्हणून भरतशेठ यांनी मंत्रिपद नाकारलं; सामंत म्हणाले, 'स्वभाव बदला...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com