Sindhudurg Politics : राणेंच्या बालेकिल्ल्यात तुफान राडा, घोषणाबाजीत ठाकरेंच्या आमदाराने नारळ फोडलाच

Thackeray Group And Bjp Workers Clash In Kudal : सिंधुदुर्गात भाजप कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला...
Thackeray Group vs Bjp Workers
Thackeray Group vs Bjp WorkersSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics Latest News : कोकणात रायगड जिल्ह्यात महाड येथे शिवसेनेचे ठाकरे व शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले. या घटनेला 24 तास होत नाही तोच तळकोकणातही राजकीय राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचे कार्यकर्ते व भाजपाचे कार्यकर्ते भिडले आहेत. हा सगळा राजकीय राडा शुक्रवारी झाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील पणदूर - घोडगे राज्यमार्गाचे रुंदीकरण तसेच मजबुतीकरण करणे या कामाच्या भूमिपूजनावरून ठाकरे गट व भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आले. एकेकाळी राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय कार्यकर्ते आता एकमेकांना आव्हान देत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, आमदार वैभव नाईक हे महायुतीच्या प्रयत्नातून झालेल्या कामांचे भूमिपूजन करून श्रेय घेत असतील तर त्यांना आम्ही विरोध करू, असा इशारा भाजप पदाधिकारी दादा साईल यांनी दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Thackeray Group vs Bjp Workers
Mahad Political News : 'त्या' वक्तव्यावरून महाडमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा..

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात येणाऱ्या भूमिपूजनाला भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. त्याला शिवसैनिकांनीही प्रत्युत्तर दिले. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या वादानंतरही वैभव नाईक यांनी या रस्ता कामाचे श्रीफळ वाढवून भूमिपूजन केले. या सगळ्या प्रकरणामुळे परिसरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

वैभव नाईक यांच्याकडून भूमिपूजन

कुडाळ तालुक्यातील पणदूर घोडगे राज्यमार्गाचे रुंदीकरण तसेच मजबुतीकरण कामाचा भूमीपूजन कार्यक्रम मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. डिगस पतपेढी येथे भूमिपूजनासाठी आलेल्या आमदार वैभव नाईक यांना भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी रोखले. हे भूमिपूजन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शासकीय कार्यक्रमद्वारे करण्यात येणार आहे, अशी भूमिका भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या माध्यमातून होत असलेल्या या कार्यक्रमाला विरोध केला. त्याला शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर देत भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्याच हस्ते होईल, अशी भूमिका घेतली. यानंतर वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले. त्यामुळे भर रस्त्यात काही काळ राडा नाट्य रंगले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मठ-कुडाळ-घोडगे या मार्गाचे संपूर्ण काम हे महायुती सरकारच्या प्रयत्नातून होत असताना उबाठा गटाचे वैभव नाईक यांनी याचे भूमिपूजन करण्याचा घाट घातला, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. तर वैभव नाईक यांच्याच प्रयत्नाने रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. त्यामुळे त्यांच्याच हस्ते भूमिपूजन होईल, अशी भूमिका ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतली. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी वैभव नाईक यांना भूमिपूजन करण्यापासून रोखले. परंतु श्रीफळ वाढवून नाईक यांनी रस्ता कामाचे भूमिपूजन केलेच. यावेळी परिसरातील ग्रामस्थ ही उपस्थित होते.

Edited by Sachin Fulpagare

Thackeray Group vs Bjp Workers
Deepak Kesarkar : "शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन होणार होते पण राऊतांनी...": केसरकरांचा गौप्यस्फोट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com