भास्कर जाधवांच्या मागणीने शिवसेनेत बंडाची बिजे?

आघाडीमध्ये निवडणूका पार पडल्या तर शिवसेनेत संघर्ष अटळ असल्याचे बोलले जात आहे.
Bhaskar Jadhav
Bhaskar JadhavSarkarnama
Published on
Updated on

चिपळूण : महानगरपालिका, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका गेल्या एक वर्षभरापासून रखडल्या आहेत. मात्र आता या निवडणूका लवकरच होण्याच्या शक्यता आहेत. याच दरम्यान चिपळूण नगरपालिकेची ही निवडणूक होणार आहे. मात्र अशातच आता आमदार भास्कर जाधवांच्या (Bhaskar Jadhav) मागणीने चिपळूण शिवसेनेत बंडाची बिजे पेरली असल्याच्या चर्चा आहेत. भास्कर जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसाठी पक्षाकडे काही जागांची मागणी केली आहे, पक्षाने त्यांची ही मागणी मान्य केली तर शिवसेनेला पालिकेची निवडणूक फार अवघड नाही, असा त्यांचा दावा आहे. मात्र जाधवांना डावलले गेले तर शिवसेनेत बंड होण्याची शक्यता आहे.

image-fallback
आमदार भास्कर जाधव रस्त्यावर उतरले

तिकीट वाटपावरून सध्या शिवसेनेत मोठी स्पर्धा आहे. अशातच आघाडीमध्ये या निवडणूका पार पडल्या तर शिवसेनेत संघर्ष अटळ असल्याचे बोलले जात आहे. पालिकेत शिवसेनेची सध्या ११ सदस्य संख्या आहे. त्यात आमदार जाधव यांनी पक्षाकडे काही जागा मागितल्या आहेत. त्यामुळे शिवसेना त्यांना न्याय देणार की पालिका निवडणूकीतून अलिप्त ठेवणार, याकडे लक्ष लागले आहे. भरीस भर पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी नुकतीच उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी पक्षाच्या आजी-माजी आमदारांना डावलून काही ठिकाणी बैठका घेतल्या, तेव्हा आजी-माजी आमदारांना बैठकांसाठी घेऊन या अशी विनंती कार्यकर्त्यांनी केली होती.

चिपळूणमध्ये सध्या महाविकास आघाडी :

साडेचार वर्षांपूर्वी पालिकेची निवडणूक झाली तेव्हा भाजपला नगराध्यक्षपदासह पाच नगरसेवकपदांची लॉटरी लागली होती. सुरेखा खेराडे नगराध्यक्ष आणि एका प्रभागातून विजयी झाल्या होत्या. नंतर त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. भाजपने शिवसेनेला बाजूला ठेवण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादीला बरोबर घेऊन सत्ता स्थापन केली. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष ही दोन महत्त्वाची पदे भाजपने आपल्याकडे ठेवली. स्थायी समितीवर ही भाजपचेच वर्चस्व होते.

Bhaskar Jadhav
शरद पवारांनी सर्वकाही देऊनही भास्कर जाधवांनी राष्ट्रवादी सोडली

भाजपच्या या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी शिवसेनेकडून पहिल्या वर्षापासून सतत प्रयत्न सुरू होते. त्याला यश येऊ नये, म्हणून भाजपने विषय समित्यांचे सभापतिपद कॉंग्रेस, राष्ट्रवादीला देऊन सत्ता टिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या बाजूला राज्यात सत्ताबदल होऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आली. तोच पॅटर्न चिपळूण पालिकेत राबवण्यात आला आहे.

"शिवसेनेत कोणावरही अन्याय होणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आजी-माजी आमदार, खासदार विनायक राऊत आणि पक्षाचे पदाधिकारी एकत्र बसून पालिका निवडणुकीसाठी निर्णय घेतील. यावेळी पालिकेवर एकहाती भगवा फडकवण्याचे स्वप्न पूर्ण होईल."

- बाळा कदम, चिपळूण विधानसभा क्षेत्रप्रमुख

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com