

भास्कर जाधव यांनी शरद पवारांना सोडण्याचा निर्णय चूक असल्याची कबुली दिली.
त्यांनी राष्ट्रवादी पक्षाने दिलेल्या संधींची आठवण करून दिली.
सध्या ते अडचणीच्या काळात उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे असल्याचे सांगितले.
Bhaskar Jadhav on Sharad Pawar : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी मुंबईत एका मुलाखतीत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोडून आपण सर्वात मोठी चूक केली, अशी कबुली दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधान आले असून त्यांनी आपण अशी चूक पुन्हा करणार नाही असे म्हटले आहे. तर अडचणीच्या काळात उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभा आहे, असे म्हटले आहे.
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर सुरू होण्याची चर्चा सुरू झाली असून आधीच शिवसेनेचे ४० आमदार फोडत एकनाथ शिंदे यांनी आपली चूल वेगळी थाटली आहे. राष्ट्रवादीचे आमदारही दिवंगत अजित पवार यांच्यासोबत पक्षातून बाहेर पडले आणि भाजपसोबत महायुतीकरून सत्ता स्थापन केली. मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ काही मोजक्यांसह भास्कर जाधव यांनी सोडली नाही.
दरम्यान आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहे. तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे अडचणीत आल्याची चर्चा राज्यभर होताना दिसत आहे. अशातच भास्कर जाधव यांना मुंबईत एका मुलाखतीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ का सोडली नाही असा त्यांनी यामागचे कारण सांगितले. तसेच 'शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं मला खूप काही दिलं, तो पक्ष मी सोडायला नको होतं', अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली आहे.
यावेळी ते म्हणाले, 'राष्ट्रवादी मी सोडायला नको होती. राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा मी पवारसाहेबांना सोडायला नको होतं. आता जो पवारसाहेबांचा पक्ष फुटला त्यावेळी मी त्यांच्यासोबत उभं राहायला पाहिजे होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून एक चूक मी आयुष्यात केली होती. त्यांनी मला खूप काही दिलं तरी मी तो पक्ष सोडला. त्यामुळे एकदा चूक झाली, पुन्हा चूक करायची नाही. हे मी ठाकपणे ठरवलं आहे. यामुळे अडचणीच्या काळामध्ये मी उद्धवसाहेबांच्या बरोबरच आहे.'
याच्याही आधी गेल्या वर्षा भास्कर जाधव यांनी, शरद पवारांना सोडून मोठी चूक केली असे वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर राज्यभर चर्चांना उधाण आले होते. म्हणाले होते की, शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय चुकीचा होता. त्यामुळे मला काही चुकल्यासारखं वाटतंय, असं नाही. याबाबत मी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच मी घेतलेला निर्णय चुकीचा होता, हे देखील मी स्पष्टपणे बोललो आहे. तर जे बोलले ते लपूनछपून नाही तर स्पष्ट बोललो आहे. मात्र याचा अर्थ मला आता याची खंत वाटते आहे, असं नाही, असेही ते बोलले होते.
तसेच मला मंत्रीपद मिळायला पाहिजे होतं. पण ते मिळाले नाही. याचे कारणही कोणाकडे नाही. तर कारण असेल तर त्यांनी ते स्पष्ट करावे असे आव्हान केले होते. तर मंत्रीपद मिळालं नाही म्हणून मी रडत बसलो नाही किंवा मंत्रीपद मिळालं नाही म्हणून जे फुटून गेले, त्यांच्यासोबतही मी गेलो नाही.
उलट मी लढतोय. आता कार्यकर्ते कमी होतायत म्हणून निवृत्ती घेण्याचं कारण नाही. उलट मी 39 जागांपैकी मी एकटा निवडून आलो असून आठ वेळा निवडणूक जिंकली आहे. यामुळेच आता थांबायचा विचार करावा, असं वाटतं असेही भास्कर जाधव यांनी म्हणत राजकीय संन्यासाचे संकेत होते.
1. भास्कर जाधव यांनी काय कबुली दिली?
शरद पवारांना सोडणे ही चूक होती असे त्यांनी मान्य केले.
2. त्यांनी कोणाचा उल्लेख केला?
राष्ट्रवादी पक्षाने दिलेल्या संधींचा उल्लेख केला.
3. सध्या ते कोणासोबत आहेत?
ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे आहेत.
4. हे वक्तव्य कुठे केले?
मुंबईतील एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले.
5. या वक्तव्याचा परिणाम काय होऊ शकतो?
राजकीय चर्चांना उधाण येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.