Bhaskar Jadhav : भाजपवर जाधवांचा उपरोधिक हल्ला; 'नेहरू-ठाकरेला दोष दिला नाही हेच नशीब!'

bjp vs shivsena Over lpg petrol crisis and kerosene decision : राज्यातील गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्यानंतर राज्य सरकार उपाय योजना करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमिवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आता सरकारला धारेवर धरले जात आहे.
bjp vs shivsena Over kerosene decision; uddhav thackeray, Jawaharlal Nehru and devendra fadnavis
bjp vs shivsena Over kerosene decision; uddhav thackeray, Jawaharlal Nehru and devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. देशभरात एलपीजी गॅस आणि पेट्रोलसाठी रांगा लागल्यामुळे इंधन तुटवड्याची चर्चा वाढली आहे.

  2. सरकारकडून पुरेसा साठा असल्याचा दावा केला जात असताना विरोधकांनी त्यावर टीका केली आहे.

  3. अंबादास दानवे आणि भास्कर जाधव यांनी भाजपवर आरोप करत केरोसिन निर्णयावरूनही सरकारला लक्ष्य केले आहे.

Ratnagiri News : राज्यासह देशात गॅस आणि पेट्रोलसाठी सर्वत्र रांगा लागत आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडर तर देणेचं बंद केले असून आता कुठे २० टक्के कोटा वाढवला आहे. पण अशातही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात इंधनाचा पुरेसा साठा असल्याचे सांगत आहेत. ते 'ऑल इज वेल' चा दावा करत असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी करत डोळे उघडा आणि परिस्थिती पहा, असा टोला लगावला होता.

यामुळे भाजप विरूद्ध असा शिवसेना कलगितुरा रंगला असतानाच आता आमदार भास्कर जाधव यांनी देखील भाजपचा चिमटा काढत डिवचले आहे. त्यांनी सरकारने केरोसिन देण्याच्या निर्णयाचा मुद्दा उपस्थित करत अफवा पसरवण्यात भाजपचा कुणीच हात धरू शकत नाही अशी खोचक टीका केली आहे. तसेच नेहरू यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यामुळे गॅस, पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या, असं भाजपने म्हटले नाही, याबद्दल धन्यवाद देतो असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

अमेरिका-इज्राइल आणि इराणमधील युद्धाचा फटका भारताला बसत आहे. राज्यासह देशात गॅस आणि पेट्रोलसाठी सर्वत्र रांगा लागत आहेत. तरीही एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात इंधनाचा पुरेसा साठा असल्याचे सांगत आहेत. तर दुसरीकडे स्वतः पंतप्रधान देशात आता कोरोनासारखी स्थिती पुन्ही उद्भवू शकते असं सांगत आहेत.

bjp vs shivsena Over kerosene decision; uddhav thackeray, Jawaharlal Nehru and devendra fadnavis
Bhaskar Jadhav : जाधवांचा आक्रमक अवतार! ‘कॅप्टन खरात’मुळे मंत्र्यांची अडचण, अखेर सीएम मैदानात

तर मुख्यमंत्री राज्यात कशाचाही तुटवडा नाही असं सांगत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू असा इशारा देत आहेत. अनेक ठिकाणचे पेट्रोल पंप बंद असून एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. त्यातच सरकारने आता केरोसिन वाटपाचेही जाहीर केले आहे. यामुळे अफवा पसरवण्यात भाजपचा कुणीच हात धरू शकत नाही असा टोला भास्कर जाधव यांनी केंद्र आणि राज्य सरकारला लगावला आहे.

यावेळी गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्यासंबंधी बोलताना भास्कर जाधव यांनी सरकारवर जहरी टीका केलीय. यावेळी ते म्हणाले, काँग्रेसच्या काळात साडे तीनशे रुपयांना गॅस मिळत होता. जो आता हजार-बाराशेला घ्यावा लागत आहे, असे चित्र असूनही भाजपवाले काँग्रेसवर टीका करतात.

केरोसिन का देता?

एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात इंधनाचा पुरेसा साठा असल्याची ग्वाही देताना दिसत आहेत. पण पंतप्रधान स्वत: कोविड सारखी स्थिती असल्याचे म्हणत आहेत. पण आपले पुढारी काहीच झालं नाही असे वागत असून ते बढाया मारत असल्याची टीका भास्कर जाधव यांनी फडणवीस यांच्यावर टीका केलीय.

तर एकीकडे सगळं भरपूर आहे असे सांगायचं. मग राज्यात बंद असलेले केरोसिन रेशनवर द्यायचा निर्णय का घेता असाही सवाल आता भास्कर जाधव यांनी केला आहे. तर भाजप अफवा पसरवण्यात तरबेज असून त्यांनी फक्त आजच्या परिस्थितीला नेहरू आणि उद्धव ठाकरेंना जबाबदार धरले नाही, तसा आरोप भाजपने केला नाही, याबद्दल आपण धन्यवाद देत असल्याचेही म्हटलं आहे.

bjp vs shivsena Over kerosene decision; uddhav thackeray, Jawaharlal Nehru and devendra fadnavis
Bhaskar Jadhav : कोकणात भास्कर जाधवांची साखरपेरणी : कदमांसोबतच्या तब्बल 25 वर्षांच्या राजकीय वादाची शेवटाकडे वाटचाल

FAQs :

1. सध्या इंधन तुटवडा आहे का?
काही ठिकाणी गॅस आणि पेट्रोलसाठी रांगा लागल्याने तुटवड्याची स्थिती असल्याचे दिसत आहे.

2. सरकार काय म्हणत आहे?
सरकारने इंधनाचा पुरेसा साठा असल्याचा दावा केला आहे.

3. विरोधकांची प्रतिक्रिया काय आहे?
विरोधकांनी सरकारवर टीका करत वास्तव परिस्थिती वेगळी असल्याचे म्हटले आहे.

4. केरोसिन देण्याचा निर्णय का घेतला?
इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर पर्याय म्हणून हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.

5. पुढील काळात परिस्थिती कशी असेल?
पुरवठा सुरळीत झाला नाही तर तुटवडा वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com