Congress ticket controversy : धर्म आडवा आला, हिंदू असल्याने उमेदवारी नाकारली; मुलाच्या उमेदवारीसाठी लढणारा माजी खासदार काँग्रेसवर संतापला!

Bhiwandi Municipal Election: Congress Denies Ticket to Son Ex-MP Suresh Taware Angry : ठाणे महापालिका निवडणुकीत भिंवडीतून मुलाला उमेदवारी नाकारल्याने माजी खासदार सुरेश टावरे यांची नाराजी लपून राहिली नाही.
Suresh Taware
Suresh TawareSarkarnama
Published on
Updated on

Bhiwandi Municipal Election : भिंवडी महापालिका निवडणुकीत, काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांना जोरदार धक्का बसला आहे. त्यांचे पुत्र मृगस्थ यांना महापालिकेच्या उमेदवारीत डावलण्यात आलं आहे. यावरून ते संतापले असून, सेक्युलर काँग्रेसने हिंदू-मुस्लिम, अशी बेरीज करत ही उमेदवारी डावलल्याचा आरोप माजी खासदार टावरे यांनी केला.

"ज्या शहरात आम्ही हिंदू-मुस्लिम एकोप्यात एवढी वर्षे राजकारण करीत आलो, त्या शहरात महापालिका निवडणुकीत प्रभागात हिंदू मतदार कमी असल्याने माझ्या मुलाला उमेदवारी नाकारल्याने दुःख होत आहे, अशी खंत माजी खासदार सुरेश टावरे यांनी व्यक्त केली.

काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांनी भिवंडी महापालिका निवडणुकीत (Municipal Election) मुलगा मृगस्य यासाठी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. त्याबाबत प्रदेश पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आश्वासन दिले होते. पण ऐनवेळी काँग्रेस शहराध्यक्ष रशीद ताहीर यांनी सुमारे 27 हजार मतदारसंख्या असलेल्या प्रभागात अवघे दोन हजार हिंदू मतदार असल्याने उमेदवारी देण्यास नकार दिला.

या गोष्टीला काँग्रेसच्या (Congress) प्रदेश पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवत माझ्या मुलाची उमेदवारी नाकारली, हे पाहिल्यावर सेक्युलर असलेल्या काँग्रेसकडून आता कोणती अपेक्षा कराल? असा सवाल माजी खासदार सुरेश टावरे यांनी केला. मी स्वतः या विभागातून निवडून आलो होतो. आमचे एवढ्या वर्षांचे सलोख्याचे संबंध असताना, आज धर्म अडवा कसा आला? अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे.

Suresh Taware
Nashik NMC Election: बॉम्बस्फोटातील गुन्हेगाराबरोबर डान्सचा आरोप; तरी विसरभोळ्या भाजपकडून बडगुजरांच्या घरी तिघांना उमेदवारी?

भिवंडी काँग्रेस पक्षाला पोषक वातावरण असताना, सर्वच प्रभागांतून असंख्य इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. पण ऐनवेळी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख आणि प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्यात वादंग झाला. आमदार रईस शेख यांनी काँग्रेस वरिष्ठांकडे मॅनेज करीत भिवंडी पूर्व विभागाची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे पक्षाने पक्षाशी कोणताही संबंध नसलेल्या आमदार रईस शेख यांच्याकडे परस्पर 45 एबी फॉर्म दिले.

Suresh Taware
BJP politics : ठाकरेंचा उमेदवार पळवताच, शिंदे शिवसेनेच्या शक्तिप्रदर्शनाचाही रंग उडाला; धुरंधर भाजपनं जळगावमध्ये नेमकी काय खेळी खेळली?

यामुळे भिवंडी पूर्वमधील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मेहनतीवर पाणी फेरण्याचे काम पक्षाने केले असून, पक्ष रईस शेख यांच्यासमोर हतबल झाला आहे, अशी टीका माजी खासदार सुरेश टावरे यांनी केली आहे. विशेष म्हणजे या भागातील अनेक प्रभागांत एबी फॉर्म असतानाही ते न भरता दुसऱ्या पक्षाचे एबी फॉर्म भरीत असल्याने, उद्या समाजवादी व काँग्रेस या दोन्ही पक्षांवर रईस शेख यांनी ताबा मिळवला, तर आश्चर्य वाटायला नको, अशी भीती देखील सुरेश टावरे यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com