Uddhav Thackeray Barsu Sabha : मोठी बातमी! उध्दव ठाकरेंच्या बारसू येथील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली; पण...

Barsu Oil Refinery Project : उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी दौऱ्याच्या दिवशी भाजप-शिवसेना शिंदे रिफायनरीच्या समर्थनात मोर्चा काढणार आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama

Barsu Refinery Project Protest : मागील काही दिवसांपासून बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या प्रकल्पावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे.या प्रकल्पाला ठाकरे गटानंही तीव्र विरोध केला आहे. याचवेळी शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकऱे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येत्या 6 मे ला बारसूला जाणारच अशी घोषणा केली आहे. मात्र,आता उद्धव ठाकरेंच्या सभेला परवानगी पोलिसांनी नाकारल्याची माहिती समोर येत आहे.

बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन राजकारण तापलेलं असतानाच उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे शनिवारी(दि.६) आंदोलकांची भेट घेण्यासाठी जाणार आहे. यावेळी ठाकरे गटाकडून रानतळे येथे उद्धव ठाकरे यांच्या सभेची तयारी करण्यात आली होती. मात्र, आता जिल्हा प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची सभा घेण्याची परवानगी नाकारल्याची माहिती समोर येत आहे. पण याचवेळी बारसू गावातील रिफायनरी विरोधकांना भेटण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे.

Uddhav Thackeray
MNS News: ''उध्दवचं मुख्यमंत्रीपद जावं असं कधीच वाटलं नाही..''; राज ठाकरेंच्या मातोश्री असं का म्हणाल्या?

रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू(Barsu) येथे माती परीक्षणाचे काम हाती घेण्यात आली असून या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. या आंदोलकांना उद्धव ठाकरे भेटणार आहेत.

राजापुरातील विविध संघटना, ग्रामपंचायतीचे सरपंच, जमीन मालक, बागायतदार, व्यापारी असे हजारो बारसूवासीय प्रकल्पावरुन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यावेळी नाणारसह बारसू परिसरातील शेतकरी, जमीनदार प्रकल्पासाठी जमिनीची संमतीपत्रे ठाकरे यांना सादर करणार आहेत.

Uddhav Thackeray
Nagpur News : नागपूरला मिळाले नऊ कोटी, फडणवीसांचा जिल्हा वगळल्याने कॉंग्रेसने केले होते आंदोलन !

भाजप-शिवसेना समर्थनार्थ मोर्चा काढणार

उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी दौऱ्याच्या दिवशी भाजप-शिवसेना शिंदे रिफायनरीच्या समर्थनात मोर्चा काढणार आहे. बारसू रिफायनरीच्या समर्थनार्थ महायुतीचा प्रत्युत्तर मोर्चा रत्नागिरी हेलिपॅडपासून सुरू होणार असल्याची चर्चा आहे. याच ठिकाणी उद्धव ठाकरे उतरणार असल्याचे म्हटले जात आहे.

उध्दव ठाकरे काय म्हणाले होते?

भाजप नेते नारायण राणे(Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा दिला होता. उद्धव ठाकरे यांना रत्नागिरीत पाय ठेवू देणार नाही असं राणे म्हणाले होते. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी आपण येत्या 6 मे ला बारसूला जाणार असल्याची मोठी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी त्यांनी मी बारसूत जाऊन आंदोलकांशी बोलणार आहे. बारसू पाकव्याप्त काश्मीर नाही. 6 तारखेला बारसूला जाणार मग महाडच्या सभेला जाणार असं ठाकरे म्हणाले होते.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com