अलिबागमधील भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

इतर पक्षाचे वर्चस्व मोडीत काढून झालेल्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
BJP_ncp
BJP_ncpSarkarnama
Published on
Updated on

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील पोयनाड, देहेन गाव, चिंचवटी येथील शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. या परिसरात इतर पक्षाचे वर्चस्व मोडीत काढून झालेल्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. (BJP Activits from Alibag join NCP)

सुतारवाडी येथे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता ढवळे, अलिबाग तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष मनोज शिर्के, जिल्हा कार्यालय चिटनिस गौरव पाटील, राष्ट्रवादी विध्यर्थी संघटना तालुका अध्यक्ष जितेंद्र भवड आदी राष्ट्रवादीचे अलिबाग तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

BJP_ncp
शाब्बास अभिजित...! : सांगोला कारखाना सुरू करणाऱ्या पंढरपूरच्या पाटलांचे शरद पवारांकडून कौतुक

दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर या तीन गावांतील कार्यकर्त्यांनी पालकमंत्री अदिती तटकरे आणि तालुकाध्य दत्ता ढवळे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. यामध्ये पोयनाड येथील सचिन पाटील यांचासह 40 कर्यकर्ते, चिंचवटी येथील मोहन कांबळी व हिंमत पाटील यांच्या समवेत भारतीय जनता पक्षाचे 40 कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

BJP_ncp
काँग्रेसचा चोपडाच्या जागेवरून राष्ट्रवादीला इशारा : अरुण गुजराथी, एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा पणाला!

दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर माथेरान नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजेश दळवी यांनीही नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यातच अलिबागमधील काही भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे. आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विशेषतः खासदार सुनील तटकरे यांच्याकडून संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com