खोपोलीत भारतीय जनता पक्षाला धक्का!

भाजपचे नगरसेवक तुकाराम साबळे यांनी नगरसेवकपद व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.
Tukaram Sable
Tukaram SableSarkarnama
Published on
Updated on

खोपोली : खोपोली नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला (BJP) मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आणि वरिष्ठ पदाधिकारी तुकाराम साबळे यांनी नगरसेवक पदासहित पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. तुकाराम साबळे यांच्या राजीनाम्याच्या निर्णयामुळे खोपोली शहर भाजपला मोठा धक्का बसला आहे. (BJP corporator Tukaram Sable resigns as corporator and party member)

Tukaram Sable
जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची भरसभेत केली कानउघडणी!

खोपोली नगरपालिकेत अनेक वर्षे नगरसेवक असलेले तुकाराम साबळे यांनी विविध पदांवर काम केलेले आहे. विविध पदांच्या माध्यमातून कार्यशील असलेले तुकाराम साबळे हे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील एक महिन्यापासून खोपोलीत होती. त्याप्रमाणे त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकपदाचा राजीनामा रायगडचे जिल्हाधिकारी, खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे दिला आहे. तसेच, भाजप पक्ष सदस्याचा राजीनामा पक्षाचे शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

Tukaram Sable
शिवसेना अशीच वागणार असेल तर राष्ट्रवादीला वेगळा विचार करावा लागेल

दरम्यान, ज्येष्ठ नगरसेवक तुकाराम साबळे लवकरच शिवसेनेत (shivsena) प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. मूळचे काँग्रेस पक्षाचे असलेल्या साबळे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर दोन वेळा नगरसेवक पद, त्यानंतर शेकापच्या तिकिटावर एक वेळा नगरसेवक उपभोगले आहे. विद्यमान काळात ते भाजपचे नगरसेवक म्हणून कार्यरत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com