Bal Mane News: लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात विधानसभा देऊ; भाजप माजी आमदारांच्या विधानाने खळबळ

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency 2024: रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून बाळ (सुरेंद्र) माने निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून ओळखले जातात.
Bal Mane News
Bal Mane NewsSarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri Political News : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency 2024) भाजप आणि शिंदे गटात धुसफूस सुरू आहे. या वादात आता रत्नागिरी येथील भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनीही रत्नागिरी सिंधुदुर्गसहित कोकणातील तीनही लोकसभा मतदारसंघ भाजपलाच मिळायला हवेत, अशी मोठी मागणी केली आहे.

इतकेच नाही तर रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात आम्ही रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ सोडायला तयार आहोत, असेही मोठे वक्तव्य बाळ माने यांनी केले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी ही मागणी केली आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचाच खासदार झाला पाहिजे, संसदीय कामकाजाची माहिती असलेला चांगला उमेदवार हा येथील भाजपचा खासदार असायला हवा. लोकसभेच्या बदल्यात आम्ही रत्नागिरी विधानसभा द्यायला तयार आहोत.

त्यासाठी येत्या सहा महिन्यांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला काही द्यावे लागले तर देऊ, असे सांगत आपल्याला कुठेतरी काहीतरी सत्तेचा लाभ घ्यायला संसदेत जायचं नाही तर आज जगात आपला देश एक नंबरवर असावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) काम करीत आहेत. त्या हिंदुस्तानच्या संसदेमध्ये विचाराने काम करणारा संसदेच्या कामकाजाची माहिती असणारे लोक आपल्याला संसदेत पाठवायचे आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपचे माजी आमदार आणि रत्नागिरी विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळ माने यांनी मोठे विधान केले आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून बाळ (सुरेंद्र) माने निवडणुकीसाठी आहेत इच्छुक. ते उमेदवार म्हणून ओळखले जातात.

रत्नागिरी जिल्ह्यात व विधानसभा मतदारसंघात माजी आमदार बाळ माने यांनी जोरदार कार्यक्रम संपर्क करायला सुरुवात केली आहे. ते आगामी विधानसभा निवडणुकीचे इच्छुक उमेदवार म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Bal Mane News
CM Pramod Sawant: महायुतीत उमेदवारीवरून वादाची ठिणगी? मुख्यमंत्री म्हणाले,'नो कॉम्प्रोमाइज'

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, "रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कमळ फुलवायचे आहे ही काळ्या दगडावरची रेष आहे. कोणी पण कुठलेही तिकीट मागून द्या. ही जागा फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या कमळासाठीच आहे."

या वेळी व्यासपीठावर माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, राजन तेली आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या या जागेवरून महायुतीमधील शिवसेना भाजपमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com