Konkan News : भास्कर जाधवांचा भाजपवर मोठा आरोप; ‘पवारांना आलेल्या धमकीमागे भाजपचा हात शक्य’

चंद्रकांत पाटील यांनी पवार यांचे काळेबेरे बाहेर काढीन, अशी धमकीवजा भाषा वापरली आहे
Sharad Pawar-Bhaskar Jadhav
Sharad Pawar-Bhaskar JadhavSarkarnama
Published on
Updated on

गुहागर : सध्या देशामध्ये लोकशाही नसून हुकूमशाहीची भाषा सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना बेळगाव, कर्नाटकमधून आलेल्या धमकीच्या फोनमागे भारतीय जनता पक्षाचा (BJP) हात असू शकतो, असा आरोप आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केला आहे. (BJP may be behind the threat to Sharad Pawar : Bhaskar Jadhav)

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव गुहागरात आले असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचे फोन येत आहेत, यावर आमदार जाधव यांनी भाजप नेत्यांचा समाचार घेतला आहे.

Sharad Pawar-Bhaskar Jadhav
Solapur : सोलापुरात शिंदे गटाला शिवसेनेचा दणका; उपजिल्हाप्रमुखाचा ठाकरे गटात प्रवेश

आमदार जाधव म्हणाले की, भाजपचे काही नेते दादागिरीची भाषा करत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत मदत केली नाही, तर विकासनिधी देणार नाही, अशा धमक्या मतदारांना देत आहेत. त्यांचे हे वक्तव्य लोकशाहीविरोधी आहे. केंद्र सरकारचे प्रतिनिधी, राज्य सरकारमधील नेते यांच्याकडून अशी लोकशाहीची पायमल्ली होत आहे. त्यामुळे सध्या देशात लोकशाही राहिलेली नसून या पक्षाच्या नेत्यांनी हुकूमशाहीची व दादागिरीची भाषा वापरण्याची भूमिका घेतलेली दिसून येत आहे.

Sharad Pawar-Bhaskar Jadhav
Gram Panchayat Election : पालकमंत्र्यांसह भाजपचे बडे नेते उतरले बाराशे मतदारांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचारात!

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई हल्ला प्रकरणसंदर्भात शरद पवार यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. असे असताना चंद्रकांत पाटील यांनी पवार यांचे काळेबेरे बाहेर काढीन, अशी धमकीवजा भाषा वापरली आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे, असा मुद्दाही आमदार भास्कर जाधव यांनी मांडला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com