नारायण राणेंचं धक्कातंत्र! मतदार यादीतून नाव वगळूनही मुलगा जिल्हा बँकेवर संचालक

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची (Sindhudurg District Bank Election) निवडणूक अतिशय गाजली होती.
Nitesh Rane and Narayan Rane
Nitesh Rane and Narayan RaneSarkarnama

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक (Sindhudurg District Bank Election) अतिशय गाजली होती. या निवडणुकीत भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी किंगमेकरची भूमिका बजावली होती. निवडणुकीआधीच तत्कालीन संचालक मंडळाने राणेंचे नावच मतदार यादीतून वगळले होते. आता हेच राणे बँकेवर संचालक म्हणून निवडले गेले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या या खेळीने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अतिशय प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीच्या पॅनेलचा धुव्वा उडवत निर्विवाद बाजी मारली होती. जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधी शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. या प्रकरणात आमदार नितेश राणे अडचणीत आले आहेत. त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. जिल्हा बँक निवडणुकीआधी राणेंचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले होते. त्यांची थकबाकी असल्याचे कारण यामागे दिले होते. आता नारायण राणे यांनी सगळ्यांनाच धक्का देत नितेश यांची बँकेच्या स्वीकृत संचालकपदी निवड केली आहे.

स्वीकृत संचालक पदासाठी आमदार नितेश राणे यांचे नाव केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निश्चित केले होते. आज जिल्हा बँकेच्या स्वीकृत संचालकपदी नितेश राणेंची निवड करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी आमदार नितेश राणे यांची थकबाकी असल्याचे कारण देत बँकेच्या मतदार यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आले होते. त्यानंतर संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणेंचे नाव आल्यामुळे ही निवडणूक गाजली होती.

Nitesh Rane and Narayan Rane
जमिनी लाटल्याप्रकरणी बडे मासे गळाला! नायब तहसीलदारासह मंडळाधिकाऱ्याला अटक

जिल्हा बँक निवडणुकीत आमदार नितेश राणे किंगमेकर च्या भूमिकेत होते. आणि आता आमदार नितेश राणे स्वतः जिल्हा बँकेत स्वीकृत संचालक झाले आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर नारायण राणेंना हा आणखी एक धक्का दिल्याचे मानले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या आजच्या बैठकीला आमदार नितेश राणे जिल्हा बँकेत उपस्थित होते. या वेळी त्यांची स्वीकृत संचालक पदी निवड करण्यात आली.

Nitesh Rane and Narayan Rane
प्रचंड बंदोबस्तात सोमय्यांनी कोर्लई गाव गाठलं पण त्या जागेकडे फिरकलेच नाहीत!

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे मनीष दळवी तर उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झाली आहे. दळवी हे नारायण राणे यांचे निकटवर्तीय मानले जातात. विशेष म्हणजे, शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणात दळवी हे आरोपी आहेत. त्यांनी यातून शिवसेनेला डिवचल्याचे मानले जात होते. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राणेंच्या दोन्ही उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा 11-7 अशा फरकाने पराभव केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com