जमिनी लाटल्याप्रकरणी बडे मासे गळाला! नायब तहसीलदारासह मंडळाधिकाऱ्याला अटक

वक्फ बोर्ड इनामी जमीन घोटाळ्याप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) मोठी कारवाई केली आहे.
Pradip Pandule and Shivshankar Singhanwad
Pradip Pandule and Shivshankar Singhanwad Sarkarnama
Published on
Updated on

आष्टी : आष्टी तालुक्यात चर्चेत असलेल्या वक्फ बोर्ड (Waqf Board) इनामी जमीन घोटाळ्याप्रकरणी विशेष तपास पथकाने (SIT) मोठी कारवाई केली आहे. तालुक्यातील चिंचपूर येथील प्रकरणात तत्कालीन नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे व मंडळाधिकारी शिवशंकर सिंघनवाड यांना अटक झाली आहे. एसआयटीने आज पहाटे दोनच्या सुमारास ही कारवाई केली.

आष्टी तालुक्यात प्रदीप पांडुळे हे आठ वर्षांपेक्षा जास्त काळ नायब तहसीलदार म्हणून कार्यरत होते. सहा महिन्यांपूर्वी त्यांची परांडा (जि. उस्मानाबाद) येथे बदली झाली. शिवशंकर सिंघनवाड हे सध्या टाकळसिंग व हरिनारायण आष्टा येथे मंडळाधिकारी म्हणून नियुक्तीस आहेत. गेल्या काही महिन्यांपासून इनामी जमिनींच्या घोटाळ्यांचे प्रकरण गाजत आहे. या प्रकरणात देवस्थानांच्या जमिनींवर परस्पर नावे लावून संगनमताने जमिनी हडप करण्याचा प्रकार उघड झालेला आहे.

या प्रकरणाचा गाजावाजा झाल्यावर सरकारने तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. याच पथकाने चौकशी करुन तालुक्यातील चिंचपूर येथील वक्फ बोर्डाच्या प्रकरणी आज पहाटे कारवाई केली आहे. तालुक्यातील चिंचपूर, रूईनालकोल व देवीनिमगाव येथे वक्फ बोर्डाच्या जमिनी हडपल्या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत.

Pradip Pandule and Shivshankar Singhanwad
प्रचंड बंदोबस्तात सोमय्यांनी कोर्लई गाव गाठलं पण त्या जागेकडे फिरकलेच नाहीत!

चिंचपूरच्या प्रकरणात याआधी काही जणांना अटक झाली होती. नंतर त्यांची जामिनावर मुक्तता झाली होती. तसेच, उपजिल्हाधिकारी दर्जाच्या दोन अधिकार्‍यांचाही सहभाग यात उघड झाला आहे. आता आष्टीत काम केलेला नायब तहसीलदार व मंडळाधिकारी यांनाही अटक झाली आहे. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Pradip Pandule and Shivshankar Singhanwad
महाविकास आघाडीत बिघाडी? मंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध जितेंद्र आव्हाड वाद पेटला

काय आहे घोटाळा?

आष्टी तालुक्यात हिंदू व मुस्लिम देवस्थानांच्या इनामी जमिनींवर परस्पर दुसर्‍याचे नाव लावून जमिनी हडपण्याचा प्रकार उघडकीस आले आहेत. यात हिंदू देवस्थानच्या वतीने अद्याप कोणतीही तक्रार दाखल नाही. वक्फ बोर्डाने याची गंभीर दखल घेतली आहे. जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आष्टी तालुक्यातील चिंचपूर, रूईनालकोल व देवीनिमगाव अशा तीन ठिकाणी स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात यापूर्वी काही जणांना अटकही झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com