Narayan Rane : 'बाप' काढणाऱ्या नितेश राणेंना बापानेच फटकारले; नारायण राणे म्हणाले‚...

Narayan Rane on Nitesh Rane statement : भाजप मंत्री नितेश राणे यांनी बापावरून केलेले वक्तव्यामुळे महायुतीतील मित्र पक्ष चांगलेच दुखावले आहे. तर आता यावरून ठाकरे शिवसेनादेखील आक्रमक झाली असून अंबादास दानवे यांनी जोरदार टीका केलीय.
BJP MP Narayan Rane And BJP minister Nitesh Rane
BJP MP Narayan Rane And BJP minister Nitesh Ranesarkarnama
Published on
Updated on

Shindhudurg News : महायुतीमध्ये कोणीही कितीही उड्या मारल्यातरी येथे भाजपचा मुख्यमंत्री म्हणून सगळ्यांचा बाप बसला आहे, असे वक्तव्य राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी केलं होतं. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले होते. तर यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री राणे यांची चांगलीच कानउघडणी केली होती. यानंतर आता नितेश राणे यांना त्यांचे वडील आणि माजी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी समज दिली असून त्यांनी देखील समज दिली आहे. नारायण राणे यांनी, 'मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो. मी नितेशला समज दिलीय', असे म्हटलं आहे. ते बुधवारी (ता.11) धाराशिवमध्ये तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.

नितेश राणेंच्या बाप या वादग्रस्त वक्तव्यानंतर या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनाच लक्ष घालावे लागले. त्यांनी, 'तुमच्या मनात काहीही असेल, पण कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, अशा शब्दात नितेश राणेंना खडसावलं होतं! तसेच राजकारणात पर्सेप्शन महत्त्वाचे असते, असेही खडेबोल सुनावले होते. यानंतर आता नारायण राणे यांनी आपल्या सुपुत्राचे कान धरले आहेत.

नारायण राणे यांनी, मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो. तो जनतेचा सेवक असतो. मी देखील मुख्यमंत्री होतो. त्यावेळी कायम सांगायचो की, मला साहेब म्हणू नका. सेवक म्हणा. यावेळी त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीबाबतच्या नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, कोणाचा निधी अडवणं हे चुकीचं आहे. त्याबद्दल आपण सूचना देणार असल्याचेही म्हटलं आहे.

BJP MP Narayan Rane And BJP minister Nitesh Rane
Narayan Rane यांच्या कार्यकर्त्याची Prakash Mahajan यांना धमकी, Audio Clip Viral | Call Recording |

महाजन मेंटल

दरम्यान नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मनसेचे नेते प्रकाश महाजन यांच्यावर टीकेची झोड उडवली. महाजन यांनी काल केलेल्या आव्हानानंतर राणे यांनी, महाजन हा मेंटल असून माझी तुलना त्याच्याशी का करता? मी दिल्लीला होतो. आता तेथून मी याला भेटायला क्रांती चौकात जायचं का? असा टोला देखील लगावला.

BJP MP Narayan Rane And BJP minister Nitesh Rane
Narayan Rane यांनी धमकी दिली, Prakash Mahajan यांनी चौकात येवून दंड थोपडले, Sambhajinagar |

Nitesh Rane : काय म्हणाले होते नितेश राणे ?

नितेश राणे यांनी धाराशिव येथील कार्यक्रमात जिल्हा नियोजन समितीच्या निधीबाबत बोलताना, कुणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचलं तरी सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवावं. असा इशारा देताना दम भरला होता. यानंतरच महायुतीत नाराजीचा सूर पाहायला मिळत होता. तर शिंदे गटाचे आमदारांनी थेट अक्षेप घेतला होता. त्यांचेच मोठे बंधू आणि शिवसेना आमदार नीलेश राणे यांनी देखील यावरू ट्विट करत नितेश राणेंना सबुरीचा सल्ला दिला होता. तसेच आपल्या वक्तव्यांमुळे कोणाचा फायदा होतो, याचे भान ठेवा. युतीचा धर्म पाळा असा सल्लाही भावाला दिला होता. मात्र या सल्ल्यावर टोला लगावणारे ट्विट करत टॅक्स फ्री असे उत्तर नितेश राणेंनी दिल्यानंतर नीलेश राणे यांनी ते ट्विट डिलिट केलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com