Konkan News : कोकणात भाजप-राष्ट्रवादी एकत्र : आमदार नीतेश राणे उतरले प्रचाराच्या मैदानात

भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाचे संयुक्त पॅनेल अनेक वर्षापासूनघाटे यांच्या नेतृत्वाखाली बँकेत उत्तम पध्दतीने कारभार करीत आहेत
BJP-NCP
BJP-NCPSarkarnama
Published on
Updated on

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : देवगड (Devgad) येथील अर्बन को-ऑप. बँकेचा विकास आणि विस्तारासह सभासदांना पारदर्शक कारभार देण्यासाठी भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पुरस्कृत ‘शिवम सहकार पॅनेल’ रिंगणात उतरवले आहे. जिल्हा बँक आणि तालुका खरेदी विक्री संघातील यशाप्रमाणे अर्बन बँकेतही मतदारांनी पाठीशी राहावे, असे आवाहन आमदार नीतेश राणे यांनी आज येथे मतदारांना केले. पॅनेलचे उमेदवार सक्षम असून बँक योग्य पद्धतीने चालवतील, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. (BJP-NCP together in Devgad Urban Bank elections)

आमदार संपर्क कार्यालयात भाजप आणि राष्ट्रवादी पुरस्कृत ‘शिवम् सहकार पॅनेल’च्या झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राणे माध्यमांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, प्रकाश राणे, जिल्हा बँक संचालक अ‍ॅड. प्रकाश बोडस, नगरसेविका प्रणाली माने यांच्यासह पॅनेलचे काही उमेदवार उपस्थित होते.

BJP-NCP
Daund News : तीच नदी, तेच ठिकाण; ४२ वर्षांपूर्वीही सात जणांचा झाला होता मृत्यू

आमदार राणे म्हणाले, ‘‘भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाचे संयुक्त पॅनेल अनेक वर्षापासूनघाटे यांच्या नेतृत्वाखाली बँकेत उत्तम पध्दतीने कारभार करीत आहेत. सामान्य नागरिक, शेतकरी यांच्यामध्ये परिवर्तन करून विकास साधण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सहकारामध्ये चांगले काम सुरू आहे. यापूर्वी जिल्हा बँक निवडणुकीत मतदार भाजपच्या पाठीशी राहिले. तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतही भाजप आणि राष्ट्रवादीच्या पॅनेलने बाजी मारली आहे. त्यामुळे या निवडणुकीतही मतदारांनी पॅनेलच्या पाठीशी रहावे. सहकारमंत्री अमित शहा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सहकारामध्ये मोठे काम आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने आपोआपच येथील सहकार वाढीला हातभार लागू शकेल.’’

BJP-NCP
Daund Mass Murder Case : बदल्याच्या भावनेने सुडाने पेटलेल्या पाच भावंडांनी चुलत भावासह सात जणांना संपवले

घाटे म्हणाले, ‘‘मागील सुमारे ३० ते ३५ वर्षे बँकेत ‘शिवम् पॅनेल’ कार्यरत आहे. सुरूवातीला स्थानिक व्यापार्‍यांनी काढलेल्या बँकेचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आजवर बँकेच्या सभासदांनी टाकलेला विश्‍वास वाया जाऊ दिला नाही. त्यामुळे यावेळीही मतदारांनी बँकेच्या पाठीशी राहून पॅनेलला सहकार्य करावे.’’

BJP-NCP
Sarkarnama Exclusive : अमित शहांची शिंदे-फडणवीस सरकारवर करडी नजर; तीन मंत्र्यांना कामाबाबत विचारला खरमरीत शब्दांत जाब

राजकारणविरहित सहकार वाढीवर भर

सुरूवातीपासूनच आपण सहकाराची कास धरली आहे. स्थानिक सहकारामध्ये वाढ करण्याबरोबरच नवीन संस्था काढून त्या वाढवल्या. परस्पर सहकार्यातून सहकार वाढतो. सहकाराचा कधी वैयक्तिक लाभासाठी उपयोग केला नाही. राजकारणविरहित सहकार वाढीवर भर दिल्यास संस्था मोठ्या होतात, असेही नंदकुमार घाटे यांनी या वेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com