Thackeray-Shinde Politics: खेड पंचायत समितीत ठाकरे आणि शिंदे गटात झालेल्या राड्यानंतर माजी आमदार संजय कदम ( Sanjay Kadam) यांच्यासह ठाकरे गटाच्या २० ते २५ जणांविरोधात खेडच्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे (Eknath Shinde) गटाचे तालुकाप्रमुख सचिन धाडवे यांनी याप्रकरणी (khed police) दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख सचिन धाडवे यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. जी आमदार संजय कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्याला लाठ्या - काठ्यांनी मारहाण करण्यासाठी आपला पाठलाग केल्याचा आरोप धाडवे यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर कदम यांच्यापासून आपल्या जिवाला धोका असल्याचंही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटंल आहे. या प्रकऱणी खेड पोलीस ठाण्यात संजय कदम यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे विरुद्ध ठाकरे (Uddhav Thackeray) गटामध्ये आता चढाओढ सुरु झाली आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
खेड तालुका पंचायत समितीमध्ये बुधवार (12 एप्रिल) जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत अधिकारी व ठेकेदार यांची बैठक सुरु होती. या बैठकीच्या वेळी ठाकरे गटाच्या नेत्यांना व्यासपीठावर बसवल्याने शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी भर बैठकीत गोंधळ घातला. या बैठकीत अधिकाऱ्यांनी ठाकरे गटातील माजी आमदार संजय कदम आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावर बसवून बैठक सुरु केल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे शिंदे गटाचे तालुकाप्रमुख सचिन धावडे आक्रमक झाले. या प्रकरणात त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्याचवेळी संजय कदम यांनी हस्तक्षेप केल्याने दोन्ही गटामध्ये वादावादी सुरु झाली.
दोन्ही गटामध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे, काही काळ पंचायत समिती आवारात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही गटातील हा गोंधळ हमरी- तुमरीवर आला. या राड्यामुळे संजय कदम अधिकाऱ्यांवर संतापले आणि खडे बोल सुनावत बैठकीतून निघुन गेले.ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा जमाव वाढल्याने खेड पंचायत समिती आवारात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे ही बैठक रद्द करावी लागली.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.