CM Eknath Shinde Irshalwadi: मुख्यमंत्री शिंदे दुसऱ्यांदा इर्शाळवाडीत; निवारा केंद्राची पाहणी करत ग्रामस्थांशी संवाद साधला

Irshalwadi News: रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत २० जुलैला भूस्खलन होऊन अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
CM Eknath Shinde Irshalwadi
CM Eknath Shinde IrshalwadiSarkarnama

Raigad News: रायगडमधील इर्शाळवाडीत दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 25 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत जवळपास 40 घरं दरडीखाली दबली गेली होती. यानंतर सरकारने युद्धपातळीवर बचावकार्य करत अनेकांना वाचवले. दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वत: तेथे जाऊन उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या.

यानंतर तेथील नागरीकांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंनी मंगळवारी दुसऱ्यांदा इर्शाळवाडीला भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच येथे उभारण्यात आलेल्या निवारा केंद्राची पाहणीही केली.

CM Eknath Shinde Irshalwadi
Maharashtra Politics: काँग्रेस फुटणार; सर्वपक्षीयांचे सरकार येणार ? नारायण राणेंचा नवा बॉम्ब

इर्शाळवाडी दुर्घटनेतून सुखरूप बचावलेल्या ग्रामस्थांना तात्पुरत्या स्वरुपाच्या निवारा केंद्रात स्थलांतरित केले होते. सरकारकडून त्यांना जेवणासह वैद्यकीय सुविधा, लहान मुलांसाठी नर्सरी, खेळण्यासाठी मैदान, २४ तास गरम आणि थंड पाणी, शौचालय, घनकचरा व्यवस्थापन, अशा पद्धतीची सुविधा उपल्बध करून दिलेली आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इर्शाळवाडी दुर्घटनेतील पीडित नागरिकांची भेट घेतली. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे २० जुलैला भूस्खलन होऊन अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर या नागरिकांचे राज्य सरकारकडून पुनर्वसन करण्यात आले आहे. इर्शाळवाडीच्या नागरीकांना देण्यात येणाऱ्या सोई सुविधांचाही आढावाही मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com