Nana Patole On Irshalwadi landslide : ''...तर इर्शाळवाडीत नाहक बळी गेले नसते!''; काँग्रेसच्या पटोलेंनी सरकारवर फोडले खापर

Raigad Political News : '' आतातरी सरकारने जलदगतीने...''
Nana Patole, Irshalwadi landslide
Nana Patole, Irshalwadi landslide Sarkarnama
Published on
Updated on

Raigad : रायगडमधील इर्शाळवाडीत बुधवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत १६ जणांचा करुण अंत तर २१ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर युध्द पातळीवर मदतकार्य व बचावकार्य सुरु आहे. मात्र, अद्याप १०० हून नागरिकांचा शोध लागला नसल्याची माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) गेल्या तेरा चौदा तासांहून अधिक काळापासून घटनास्थळी तळ ठोकून आहे. तसेच भाजपसह इतर पक्षाचे नेतेमंडळीही घटनास्थळी धाव घेतली. याचदरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील इर्शाळवाडीला भेट दिली. यावेळी त्यांनी या दुर्घटनेचं खापर सरकारवर फोडले आहे.

Nana Patole, Irshalwadi landslide
Irshalwadi Landslide: ...तर इर्शाळवाडीची दुर्घटना टाळता आली असती; अमित ठाकरेंनी राज्य सरकारला सुनावलं

काँग्रेस नेते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी गुरुवारी इर्शाळवाडीत दाखल झाले. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्तांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केले. यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. पटोले म्हणाले, इर्शाळवाडीतील घटना अत्यंत दुःखद आहे. वेळीच या लोकांना सुरक्षित स्थळी हलवले असते तर नाहक बळी गेले नसते. सरकारने योग्यवेळी दखल घेतली नाही असा ठपकाही त्यांनी यावेळी ठेवला.

तसेच मागील तीन चार दिवसापासून अतिवृष्टीचा इशारा दिला जात असताना धोकादायक, दरडप्रवण भागातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवायला हवं होतं. आतातरी सरकारने जलदगतीने हालचाली करुन लोकांना सर्व प्रकारची मदत मिळेल याची व्यवस्था करावी, अस पटोले म्हणाले.(Irshalwadi Landslide)

Nana Patole, Irshalwadi landslide
NCP Crisis Update : साहेबांकडून हकालपट्टी; तर दादांकडून स्वागत आणि लगेच पदभार !

पटोले यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पटोले यांनी स्थानिक लोकांशी संवाद साधून दुर्घटनेची माहिती घेतली. या घटनेतून सुखरूप वाचलेल्यांना नाना पटोले यांनी आधार दिला. सरकारने तातडीने लोकांचे पुनर्वसन करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

५० ते ६० कंटेनर्सची व्यवस्था...

रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील इर्शाळवाडी या दुर्घटनाग्रस्त गावाला भेट देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथल्या परिस्थितीचा आणि सुरू असलेल्या बचावकार्याचा आढावा घेतला.तसेच ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी ५० ते ६० कंटेनर्सची व्यवस्था करण्यात आली असून त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन देखील केलं जाईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com