Irshalwadi Landslide: ...तर इर्शाळवाडीची दुर्घटना टाळता आली असती; अमित ठाकरेंनी राज्य सरकारला सुनावलं

Amit Thackeray On Irshalwadi Landslide Incident : ''सरकार आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर ही दुर्घटना टाळता आली असती...''
Amit Thackeray On Irshalwadi Landslide Incident
Amit Thackeray On Irshalwadi Landslide IncidentSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित राज ठाकरे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार निशाणा साधला. सरकार आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर ही दुर्घटना टाळता आली असती, अशी खोचक टिप्पणी अमित ठाकरेंनी केली आहे. ते आज जळगावमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

इर्शाळवाडीच्या घटनेबाबत राज ठाकरेंनी या आधिच सूचित केले होते. यासंदर्भात सरकारला उपाययोजना करण्यासही त्यांनी सांगितले होते. मात्र, सरकार आमदार फोडण्यात व्यस्त असल्यामुळे त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ही मोठी दुर्घटना घटना घडली व लोकांना आपले जीव गमवावे लागले, असा आरोप करत अमित ठाकरेंनी राज्य सरकारला सुनावलं.

Amit Thackeray On Irshalwadi Landslide Incident
BJP Distirct President News : मुरकुटे जिल्हाध्यक्ष होताच गुट्टे समर्थक भडकले..

मनसे नेते अमित ठाकरे म्हणाले की, "इर्शाळवाडीची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र, या घटनेला काहीअंशी सरकार जबाबदार आहे. राज ठाकरे यांनी या दुर्घटनेबाबत सरकारला अगोदर सूचित केले होते. त्यांनी सरकारला उपाययोजना करण्याबाबत सांगितले होते. पण हे सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. जर वेळीच लक्ष देवून उपाययोजना केली असती तर ही घटना घडलीच नसती", असं म्हणत त्यांनी राज्य सरकारलाच या घटनेबाबत जबाबदार ठरवलं आहे.

"राज्यात जी पक्ष फोडाफोडी झाली, त्यामुळे जनतेत तीव्र संताप आहे. पक्षातर्फे राबविण्यात आलेल्या 'एक सही संतापा'ची या उप्रकमात जनतेने मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग घेवून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली", असे सांगत त्यांनी राज्यात झालेल्या पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावर संताप व्यक्त केला.

Amit Thackeray On Irshalwadi Landslide Incident
Opposition Parties Meeting : उद्धव, आदित्य ठाकरेंनी घेतली 'इंडिया'च्या तिसऱ्या बैठकीची जबाबदारी

विद्यार्थी सेना बळकट करण्यासाठी अमित ठाकरे मैदानात

"महाविद्यालयाच्या बाहेर मनसे विद्यार्थी सेनेचे फलक लावण्यात येतील, तसेच त्यावर प्रमुखांचा मोबाईल क्रमांक असेल. विद्यार्थी अडचणीबाबत त्यांच्याशी संपर्क साधतील, जर प्रमुखाकडून अडचणी सुटल्या नाहीत तर आपण मुंबईहून सोडविणयाचा प्रयत्न करणार आहोत. जर मोठी अडचण असेल तर आपण या ठकाणी जावून सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत", असं सांगत खुद्द अमित ठाकरे आता पक्ष वाढीसाठी मैदानात उतरले आहेत.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com