कुडाळ : चिपी विमानताळाच्या श्रेयावरून शिवसेना आणि राणे यांच्यात वाद रंगलेला असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच त्यावर आपल्या शैलीत भाष्य केले. सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ होण्यामागे अनेकांचे योगदान आहे. प्रत्येक पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन हा प्रकल्प पूर्ण केला आहे, त्यामुळे याचे श्रेय कोणा एकट्याला जात नाही, अशा शब्दांत त्यांनी शिवसेना-राणे यांच्या श्रेयवादावर भाष्य केले. (Contribution of all Political parties for Sindhudurg Airport : Ajit Pawar)
चिपी विमानतळाच्या श्रेयावरून शिवसेना आणि नारायण राणे यांच्यामध्ये चांगलाच वाद रंगला होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन विमानतळासाठी आपण कसे प्रयत्न केले होते, हे सांगितले होते. ते सांगताना त्यांनी नेहमीप्रमाणे शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. आजच्या कार्यक्रमात त्यांनी त्यावर भाष्य केले होते. शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत यांच्यासह अनेकांनी हे विमानतळ शिवसेनेमुळे झाल्याचा दावा केला होता. त्यावर वादावरच मुख्यमंत्री ठाकरे आणि केंद्रीय मंत्री राणे यांच्यासमोरच विमानतळ उदघाटनाच्या कार्यक्रमात सुनावले.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, “गोव्याचे नवीन विमानतळ झाले तरी सिंधुदुर्ग विमानतळामुळे जिल्ह्याचा आणि पर्यायाने कोकणचा विकास होणार आहे. त्यादृष्टीने चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करा. रत्नागिरीपासून रायगडपर्यंत पुढे जाणारा हायवे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर सिंधुदुर्ग विमानतळाचा रनवे वाढविण्यासाठी प्रयत्न केला जावा. गोव्याइतकेच चांगले समुद्रकिनारे सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभले आहेत. त्यात सिंधुदुर्ग विमानतळाने जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी आणखी भर घातली आहे. त्याचा फायदा येथील लोकांना होईल.’’
‘‘सिंधुदुर्ग विमानतळ होण्यामागे अनेकांचे योगदान आहे. प्रत्येक पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन हा प्रकल्प पूर्ण केला आहे, त्यामुळे याचे श्रेय कोणा एकट्याला जात नाही. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्घाटन झाले आहे, त्याचप्रमाणे लवकरात लवकर या ठिकाणी मंजूर असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचेही लोकार्पण आम्हीच करू. सिंधुदुर्ग विमानतळाच्या माध्यमातून आपण प्रवाशांना चांगली सेवा दिल्यास जास्तीत जास्त पर्यटक या ठिकाणीच विमानातून उतरतील, त्यामुळे येथील एअरपोर्ट प्रशासनाने त्याची काळजी घेऊन सेवा द्यावी,” अशी सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.